Crocodile Video: आला मोठा शहाणा...मगरीला पकडायला गेला, तिने दाखवला इंगा; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 04:22 PM2023-03-17T16:22:57+5:302023-03-17T16:24:10+5:30

Dangerous Crocodile Video: फक्त पाण्यातच नाही तर पाण्याबाहेरही मगर धोकादायक ठरू शकते.

Crocodile Video: man went to catch the crocodile, she showed her streangth; Watch the video | Crocodile Video: आला मोठा शहाणा...मगरीला पकडायला गेला, तिने दाखवला इंगा; पाहा Video

Crocodile Video: आला मोठा शहाणा...मगरीला पकडायला गेला, तिने दाखवला इंगा; पाहा Video

googlenewsNext


Crocodile Attack Viral Video: पाण्यात राहून मगरीशी वैर करायचे नाही, असे म्हटले जाते. पण, कधी-कधी मगर पाण्याबाहेरही धोकादायक ठरू शकते. तरीदेखील काही लोक आपला जीव धोक्यात घालून मगरीच्या अगदी जवळ जातात. याची शिक्षाही त्यांना भोगावी लागते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

मगरीने केला हल्ला
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस मैदानात आलेल्या मगरीला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतोय. यासाठी तो मगरीच्या डोळ्यावर कपडा टाकतो आणि हळु-हळू तिच्या जवळ जातो. तो व्यक्ती मगरीच्या पाठीवर बसतो आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्रा मगर त्याच्यावर हल्ला करते आणि त्याचाचा हात आपल्या जबड्यात पकडते. 

पाहा Video:-

सुदैवाने तो आपला हात मगरीच्या जबड्यातून बाहेर काढतो. यानंतर मगर त्याचा पाय पकडण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला तसे करू देत नाही. यानंतर तो मगरीच्या तोंडावर लाथ मारुन बाजूला होतो. मगरही त्यानंतर त्याच्यावर हल्ला करत नाही. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.

Web Title: Crocodile Video: man went to catch the crocodile, she showed her streangth; Watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.