ऑनलाइन सेलमध्ये मागवला लॅपटॉप, आला कपड्यांचा साबण; कंपनी म्हणाली, "काहीही करू शकत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:26 PM2022-09-27T12:26:45+5:302022-09-27T12:30:10+5:30
सध्या देशभरात ई-कॉमर्सच्या वेबसाईट मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या कंपन्या ग्राहकांना मोठी सूट देत आहेत, त्यामुळे ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. ई-कॉमर्स वेबसाईट ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा दावाही करतात.
नवी दिल्ली : सध्या देशभरात ई-कॉमर्सच्या वेबसाईट मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या कंपन्या ग्राहकांना मोठी सूट देत आहेत, त्यामुळे ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. ई-कॉमर्स वेबसाईट ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा दावाही करतात. सध्या ऑनलाईन खरेदी संदर्भात एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. एका ग्राहकाने ई-कॉमर्स वेबसाईटवर ऑनलाईन लॅपटॉप मागवला होता, पण त्या ग्राहकाला साबणाचा बॉक्स पोहोचल्याचे प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणी ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून ही माहिती दिली.
याअगोदर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, कधी ग्राहकाला पार्सलमध्ये वीट मिळाली तर कुणाला दगड मिळाल्याचे समोर आले. पण लॅपटॉप मागवून साबणाचा बॉक्स आल्याचे प्रकरण पहिल्यांदाच समोर आले आहे. एका ग्राहकाने फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवरुन लॅपटॉप मागवला होता, पण या ग्राहकाला बॉक्समधून साबण आल्याचे समोर आले आहे. या ग्राहकाने कंपनीकडे तक्रारही दाखल केली, पण त्या ई-कॉमर्स कंपनीने आपल्या रिटर्न पॉलिसीचा हवाला देत या प्रकरणी आम्ही काहीही करु शकत नाही, असं म्हटले आहे.
झाडं लावण्यासाठी खड्डे खोदत असताना सापडला मौल्यवान खजिना, पाहून शेतकरी अवाक्, मग केलं असं काही
या प्रकरणी यशस्वी शर्मा यांनी लिंकडीनवर पोस्ट शेअर केली आहे.'एका ई-कॉमर्स कंपनीच्या ऑफर सेलमध्ये मी माझ्या वडिलांसाठी एक लॅपटॉप ऑर्डर केला होता, पण ज्यावेळी ऑर्डर घरी आली तेव्हा लॅपटॉपच्या ठिकाणी साबणाचा बॉक्स असल्याचे समोर आले. यावेळी मी कंपनीकडे या संदर्भात तक्रार केली. कंपनीने या संदर्भात आपली चूक असल्याचे मान्य केले नाही. त्यांच्याकडे या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज असूनही कंपनीने आपली चूक मान्य केली नसल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
वडिलांकडून झाली मोठी चूक
घरी आलेले पार्सल घेत असताना ग्राहकाच्या वडिलांकडून चूक झाल्याचे म्हटले आहे. ई-कॉमर्स कंपनीकडून आलेले पार्सल घेत असताना त्या डिलिवरी बॉयसमोर हा बॉक्स ओपन करायचा असतो,आपले सामान आहे का पाहूनच ओटीपी नंबर द्यायचा पण वडिलांनी तो बॉक्स ओपन केला नाही.त्यामुळे ही चूक झाल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जमीन दुभंगली आणि आत सामावल्या गेल्या तरुणी, नाचता नाचता घडली मोठी दुर्घटना
सोशल मीडियावर पोस्ट का शेअर केली?
या ग्राहकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्याकडे डिलिव्हरीने बॉक्सची तपासणी न करताच परत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. यासह बॉक्स ओपन करत असतानाचेही पुरावे आहेत, यात सरळ दिसत आहे, बॉक्समध्ये लॅपटॉप नसून साबण आहेत. या प्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.आम्ही काही करु शकत नाही असं उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना टॅग केले आहे. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.