पेट्रोल संपलं पण कस्टमर खाली उतरलाच नाही; रॅपिडो चालकाने मारला धक्का, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 04:12 PM2024-02-12T16:12:26+5:302024-02-12T16:13:45+5:30
रॅपिडोच्या एका कस्टमरने बाईकचं बुकिंग केलं होतं. बुकिंगनुसार, बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने कस्टमरला इच्छित स्थळी नेण्यास सुरुवात केली, परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यावर बाईकमधलं पेट्रोल संपलं.
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. पेट्रोल संपल्यानंतर एका कस्टमरने एप बेस्ड बाईकवरून उतरण्यास नकार दिला. कस्टमर बाईकवर बसलेला असताना चालकाने बाईक पेट्रोल पंपावर नेण्यासाठी धक्का मारला. त्या मार्गावरून जात असताना कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील रॅपिडोच्या एका कस्टमरने बाईकचं बुकिंग केलं होतं. बुकिंगनुसार, बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने कस्टमरला इच्छित स्थळी नेण्यास सुरुवात केली, परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यावर बाईकमधलं पेट्रोल संपलं. पेट्रोल संपल्यावर पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी त्याने कस्टमरला बाईकवरून खाली उतरण्यास सांगितलं. मात्र त्याने बाईकवरून खाली उतरण्यास नकार दिला.
A #Rapido bike driver in #Hyderabad was forced to push his bike with a customer on it after he refused to get down when his vehicle ran out of petrol.@rapidobikeapp@newstapTweetspic.twitter.com/xs58hmM1bZ
— Anusha Puppala (@anusha_puppala) February 12, 2024
बाईक चालकाने खाली उतरण्यासाठी कस्टमरला विनंती केली. पण तो खाली उतरण्यास तयार झाला नाही. त्यानंतर चालकाने बाईक ढकलण्यास सुरुवात केली. दोघेही त्याच पद्धतीने जवळच्या पेट्रोल पंपावर पोहोचले. बाईकच्या मागे असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हि़डीओ काढला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.