'मानिके मागे हिते'चं हे बोबडं वर्जन तुमचं मन जिंकेल, चिमुकलीला ऐकताच म्हणाल...So cute!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 01:51 PM2021-10-26T13:51:12+5:302021-10-26T13:51:23+5:30

मनिके मागे हिते गाणं गाणाऱ्या क्युट आणि गोड आवाजाचा योहानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. आता हेच गाणं बोबड्या बोलात गाणाऱ्या एका चिमुकलीचाहा व्हिडीओ तितकाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओनेही सर्वांचं मन जिंकलं आहे.

cute little girl sings manike mage hithe her adorable performance goes viral wins hearts of netizens | 'मानिके मागे हिते'चं हे बोबडं वर्जन तुमचं मन जिंकेल, चिमुकलीला ऐकताच म्हणाल...So cute!

'मानिके मागे हिते'चं हे बोबडं वर्जन तुमचं मन जिंकेल, चिमुकलीला ऐकताच म्हणाल...So cute!

Next

 सोशल मीडियावर गेलात की जिथं तिथं मनिके मागे हिते (Manike Mage Hithe) गाणं ऐकायला मिळतं. श्रीलंकन गायिका योहानी (Yohani) दिलोका डी सिल्वाने गायलेलं हे गाणं धुमाकूळ घालतं आहे. योहानीच्या गोड आवाजाने सर्वांचं मन तर जिंकलंच आहे. या गाण्याचे काही भाषांमध्ये व्हर्जनही आले आहेत. अशात आता एका चिमुकलीचाही व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जिनं आपल्या बोबड्या बोलात हे गाणं गायलं आहे.

मनिके मागे हिते गाणं गाणाऱ्या क्युट आणि गोड आवाजाचा योहानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. आता हेच गाणं बोबड्या बोलात गाणाऱ्या एका चिमुकलीचाहा व्हिडीओ तितकाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओनेही सर्वांचं मन जिंकलं आहे. लिसा एन निमालाचंद्र इन्स्टाग्राम युझरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिची मुलगी आलिया सीलनोने हे गाणं गाण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हिडीओत पाहू शकता, जसं हे गाणं लागतं तशा मुलीचा उत्साह वाढतो. आपल्या दोन्ही हातात टेडी-बिअर पकडून ती हे गाणं गुणगुणताना दिसते.हे गाणं तसं आपल्यालाही नीटपणे गाता येणार नाही. ही तर एक लहान मुलगी आहे. त्यामुळे जिथं तिला शब्द येत नाही तिथं ते शेवटचा शब्द धरताना दिसते आणि जिथं तिला येते तिथं ती आपल्या बोबड्या बोलात गाते.व्हिडीओत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, आलिया सीलोनचं मानिके मगे हितेचं कव्हर व्हर्जन  @yohanimusic द्वारा कव्हर करण्यात आलं आहे. आलिया योहानीची फॅन आहे, कदाचित ती सर्वात कमी वयाची फॅन असावी.

मनिके मागे हिथे हे गाणं दाक्षिणात्य भाषेतलं वाटत असलं तरी ते कुठल्याही भारतीय भाषेतलं नाही. ते आहे श्रीलंकन गाणं. सिंहली भाषेतलं. मूळ सिंहली भाषेतलं गाणं २०२० मध्ये रीलिज झालं होतं. ते श्रीलंकन रॅपन आणि गायिका योहानी डीसिल्व्हा हिने सिंहली भाषेतच मे २०२१ मध्ये पुन्हा गायलं. अवघ्या काही महिन्यात ते भारतात हिट झालं आणि अर्थातच इथून जगभर. योहानी आणि सतीशन या दोन गायकांनी या गाण्याचं आणखी एक व्हर्जन गायलं. सध्या याच गाण्याची तमीळ, मल्याळी, तेलुगू आणि हिंदी व्हर्जन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Web Title: cute little girl sings manike mage hithe her adorable performance goes viral wins hearts of netizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.