रिअल हिरो! रुग्णालयाला लागली आग; अन् गर्भवती कुत्रीने जीवाशी खेळत वाचवले लोकांचे प्राण, पाहा फोटो
By Manali.bagul | Updated: November 24, 2020 15:25 IST2020-11-24T15:13:26+5:302020-11-24T15:25:31+5:30
Viral News in Marathi : लोकांचा जीव वाचवण्यासठी स्वतःच्या जीवाशी खेळल्यामुळे या कुत्रीचे संपूर्ण शरीर भाजले आहे. प्रथमोपचारादरम्यान कुत्र्याला मलमपट्टी लावून उपचार करण्यात आले आहेत.

रिअल हिरो! रुग्णालयाला लागली आग; अन् गर्भवती कुत्रीने जीवाशी खेळत वाचवले लोकांचे प्राण, पाहा फोटो
नेहमीच आपल्याला कुत्र्याच्या इमानदारीचे आणि स्वभावगुणांचे दर्शन घडत असते. प्राण्यांनाही माणसांप्रमाणेच मालकाचा किंवा ते राहत असलेल्या ठिकाणाचा लळा लागलेला असतो. रशियाच्या एका रुग्णालयात आग लागल्यानंतर एका कुत्रीने लोकांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली आहे. तुम्ही या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये पाहू शकता लोकांचा जीव वाचवण्यासठी स्वतःच्या जीवाशी खेळल्यामुळे या कुत्रीचे संपूर्ण शरीर भाजले आहे. प्रथमोपचारादरम्यान कुत्रीला मलमपट्टी लावून उपचार करण्यात आले आहेत.
इंडिया टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार लेनिनगार्ड प्रांताच्या एका खासगी रुग्णालयात आग लागली. आग लागल्याचे कळता त्या ठिकाणी असलेला मातिल्डा नावाची कुत्री जोरजोरात भूंकू लागली. त्यानंतर ही कुत्री रुग्णायातील प्रमुखांच्या केबिनपर्यंत भूंकत भूंकत पोहोचली. त्यावेळी काही गडबड असल्याचे रुग्णालयातील लोकांच्या लक्षात आहे. रुग्णालयातील इमारत संपूर्ण जळत असल्याचे पाहूनही या कुत्रीने आत जाण्याचे धाडस केलं. जबरदस्ती केस कापताना रडकुंडीला आला चिमुरडा; अन् न्हाव्याला धमकीच दिली, पाहा व्हिडीओ
शरीरात कार्बन मोनोऑक्साईड गेल्यामुळे ही कुत्री बेशुद्धावस्थेत होती. यावेळी रुग्णालयात ४ लोक होते. त्यांनी मिळून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. कुत्रीला बाहेर आणल्यानंतर त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा दिसून आल्या. दरम्यान आता या कुत्रीने आपल्या पिल्लांना जन्म दिला असून कुत्री आणि तिची पिल्लं दोन्ही सुरक्षित आहेत. ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्याला Hospice care म्हणतात. या रुग्णालयात दीर्घकाळापासून आजारांचा सामना करत असलेल्या रुग्णांचे उपचार केले जातात. BRT बस खराब झाली अन् पाकिस्तानचे लोक धक्का मारायला गेले; भारतीयांनी उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ