Cyclone Tauktae Video: तौत्के चक्रीवादळ आणि 'ती'; पावसात भिजत मारत होती झाडू; आनंद महिंद्रा म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 03:02 PM2021-05-17T15:02:48+5:302021-05-17T15:06:03+5:30

Anand Mahindra Retweet video of Garbage cleaner women of Mumbai: Cyclone Tauktae ने महाराष्ट्रात हजेरी लावत आता गुजरातच्या दिशेने कूच सुरु केली आहे. सोशल मीडियावर लोक या चक्रीवादळामुळे झालेली हानी किंवा त्याचे फोटो पोस्ट करत आहेत. यापैकीच हा एक व्हिडीओ आहे.

Cyclone Tauktae and her video in the rain; Anand Mahindra said ...No question about it. | Cyclone Tauktae Video: तौत्के चक्रीवादळ आणि 'ती'; पावसात भिजत मारत होती झाडू; आनंद महिंद्रा म्हणाले...

Cyclone Tauktae Video: तौत्के चक्रीवादळ आणि 'ती'; पावसात भिजत मारत होती झाडू; आनंद महिंद्रा म्हणाले...

Next

कोकण किनारपट्टीला तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून एकाचा जीवही गेला आहे. मुंबईत वादळाचा वेग हा ताशी 114 किमी एवढा प्रचंड नोंदला गेला आहे. असे असताना एवढ्या मोठ्या वादळात, भर पावसात रस्त्यावरील साफसफाई करतानाचा एका महिला सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मुंबई महापालिकेला एक सल्ला दिला आहे. (Anand Mahindra Retweet Video of Garbage cleaner women in Rain. request to BMC of Raincote. )

Anand Mahindra: आनंद महिंद्रांच्या ताफ्यात कोणत्या कंपनीच्या कार? जाणून व्हाल हैरान...


Cyclone Tauktae ने महाराष्ट्रात हजेरी लावत आता गुजरातच्या दिशेने कूच सुरु केली आहे. सोशल मीडियावर लोक या चक्रीवादळामुळे झालेली हानी किंवा त्याचे फोटो पोस्ट करत आहेत. यापैकीच हा एक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ आनंद महिद्रांनी रिशेअर केला आहे. यावर त्यांनी कमेंटही केली आहे. या महिलेचे काम प्रेरणादायी आहे. माझी बीएमसीला एक विनंती आहे, की सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोट दिलाच असेल, परंतू पुन्हा एकदा त्यांच्याकडे तो आहे की नाही हे एकदा सुनिश्चित करावे, असे म्हटले आहे. 



हा व्हिडीओ एक ट्विटर युजर @Aladdin_ka_ ने सोमवारी पोस्ट केला आहे. यावर त्याने लिहिले आहे की, त्यांचा सन्मान करा, असे प्रसंग मला किती अधिकार आहेत याची जाणीव वरून देतात...असे म्हटले आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 84 हजार व्ह्यूवज मिळाले आहेत. 1671 लाईक्स आणि 309 वेळा रिट्विट करण्यात आले आहे. तर आनंद महिंद्रांच्या रिट्विटला 3.8 हजार लाईक्स मिळाले आहेत. 

Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळाचा फटका; रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे स्थलांतरण


या छोट्याशा क्लिपमध्ये दिसत आहे की, महिला पावसात भिजत रस्त्यावर झाडू मारत आहे. केस सुके ठेवण्यासाठी महिलेने डोके प्लॅस्टिक पिशवीने गुंडाळले आहे. आजुबाजुने गाड्या जात आहेत आणि ती भिजतच तिचे काम करत आहे.

Web Title: Cyclone Tauktae and her video in the rain; Anand Mahindra said ...No question about it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.