काय सांगता! ५० वर्षापासून अन्न नाही खाल्लं, 'या' ७६ वर्षाची आजी फक्त चहा पितात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 01:13 PM2023-01-20T13:13:46+5:302023-01-20T13:13:54+5:30
जर तुम्हाला १० दिवस विना अन्न खाता फक्त चहा पिऊन रहायला सांगितले तर ते शक्य आहे का? कोणही विना अन्न खाता जगूच शकत नाही. पण, एक अशी घटना समोर आली आहे.
जर तुम्हाला १० दिवस विना अन्न खाता फक्त चहा पिऊन रहायला सांगितले तर ते शक्य आहे का? कोणही विना अन्न खाता जगूच शकत नाही. पण, एक अशी घटना समोर आली आहे. यात एक आजीने गेल्या ५० वर्षापासून अन्न खाल्लेल नाही. या आजी फक्त चहा पिऊन जगत आहेत. हुगळी जिल्ह्यातील या आजी गेल्या ५० वर्षापासून फक्त चहा आणि ज्यूस पितात.
अनिमा चक्रवर्ती असं या आजींचे नाव आहे. या आजींचे वय ७६ वर्षे आहे. त्यांनी गेल्या ५० वर्षापासून अन्न खालेल्ल नाही, तर आजी फक्त चहा आणि ज्यूस घेतात, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. 'पूर्वी आमच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती आणि माझी आई कामासाठी लोकांच्या घरी जात असे. तिथून ती जे काही तांदूळ आणायची, ती आमच्या संपूर्ण कुटुंबाला द्यायची. त्यामुळे तिच्याकडे स्वतःसाठी काहीच उरले नव्हते. तेव्हापासून ती ज्यूस आणि चहा पिऊनच आपला उदरनिर्वाह करते, असंही त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
पाण्याच्या बाटलीला वास येतो, काळपट थर जमा झालाय? पाहा बाटली साफ करण्याची १ सोपी ट्रीक...
'मी चहा किंवा ती जे काही द्रव पदार्थ खाते यातून टिकून राहण्यासाठी आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. त्यामुळेच मी निरोगी आहे, असंही आजी म्हणाल्या. अनिमा चक्रवर्ती नावाची वृद्ध महिला अन्न न खाता निरोगी आणि सामान्य जीवन जगत आहे.