आजचा 'श्रावण कुमार'! आईसाठी भरघोस पगाराची नोकरी सोडली, जुन्या स्कूटरवर तीर्थयात्रा करतो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 06:35 PM2023-04-09T18:35:55+5:302023-04-09T18:36:52+5:30

आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी, दक्षिणामूर्ती यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि १६ जानेवारी २०१८ पासून आपल्या वडिलांच्या जुन्या बजाज चेतक स्कूटरवरून भारतातील पवित्र स्थळांचा प्रवास करत आहेत.

dakshinamurthy krishnakumar left software job mother pilgrimage on an old scooter with mother | आजचा 'श्रावण कुमार'! आईसाठी भरघोस पगाराची नोकरी सोडली, जुन्या स्कूटरवर तीर्थयात्रा करतो

आजचा 'श्रावण कुमार'! आईसाठी भरघोस पगाराची नोकरी सोडली, जुन्या स्कूटरवर तीर्थयात्रा करतो

googlenewsNext

आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेकजण काहीही करतात. तर दुसरीकडे काहीजण आपल्या आई, वडिलांकडे पाहतही नाहीत. सध्या असंच एक प्रकरण समोर आले आहे. आपल्या आईसाठी एका व्यक्तीने मोठ्या पगाराची नोकरी सोडून आईला देशभरातील पवित्र स्थळावर घेऊन जात आहेत. दक्षिणामूर्ती कृष्णकुमार, कर्नाटकातील म्हैसूर येथील सॉफ्टवेअर अभियंता, आपली उच्च पगाराची सॉफ्टवेअर नोकरी सोडली आणि तीर्थयात्री बनले. आता आपल्या स्कूटरवर दक्षिणामूर्ती आपल्या आईला देशातील सर्व तीर्थक्षेत्रे दाखवत आहेत, जी त्यांच्या आईला लहानपणापासून पहायची होती. कृष्णकुमारचा प्रवास २०१८ मध्ये सुरू झाला. २०२० दरम्यान, कोविडच्या आगमनामुळे त्यांनी काही काळ विश्रांती घेतली होती.

Video: मेट्रोत चाललंय तरी काय? आता युवकाने चक्क ट्रेनमध्येच सुरू केली अंघोळ

'आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि १६ जानेवारी २०१८ पासून वडिलांच्या जुन्या बजाज चेतक स्कूटरवरून भारतातील पवित्र स्थळांचा प्रवास सुरू केला, असं दक्षिणामूर्ती म्हणाले.

आईने कृष्ण कुमारला सांगितले की ती घराजवळील मंदिरातही गेली नाही. तेव्हापासून त्यांनी ठरवले की आपल्या आईला सोबत घेऊन भारतातील सर्व मंदिरांना भेट देईल. आधी आईला विचारले असता तिने आधी नकार दिला, पण नंतर मुलाची जिद्द आणि त्याचे प्रेम पाहून तिने स्कूटरवर बसून भारत भेट देण्याचे मान्य केले. कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केलेल्या कृष्णकुमारने आपल्या आईला केवळ देशातच नाही तर नेपाळ, भूतान, म्यानमार यांसारख्या देशांची सफर घडवली.

दक्षिणामूर्तीपर्यंतचा सुमारे ६६ हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, कोलकाता, अरुणाचल प्रदेश आणि नेपाळ, भूतान आणि म्यानमारचा दौरा केला आहे. जोपर्यंत त्यांच्यात ताकद आहे..जोपर्यंत देव संधी देतो तोपर्यंत मी हा प्रवास सुरू ठेवणार असल्याचे दक्षिणामूर्ती यांनी सांगितले.

Web Title: dakshinamurthy krishnakumar left software job mother pilgrimage on an old scooter with mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.