Viral Video: अंथरुणाला खिळलेला, अंगही हलवू शकत नव्हता रुग्ण, नर्सने असे काही केले की नाचू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 05:52 PM2022-04-07T17:52:55+5:302022-04-07T17:56:05+5:30

नर्सने असं काही केलं की कित्येक दिवस अंथरूणाला खिळलेला तरुण रुग्ण अचानक अंथरूणातच नाचू लागला. या रुग्णाचा व्हिडीओही समोर आला आहे (Patient recoverd with nurse dance therapy).

dance therapy for paralysis patient in Telangana worked video goes viral on internet | Viral Video: अंथरुणाला खिळलेला, अंगही हलवू शकत नव्हता रुग्ण, नर्सने असे काही केले की नाचू लागला

Viral Video: अंथरुणाला खिळलेला, अंगही हलवू शकत नव्हता रुग्ण, नर्सने असे काही केले की नाचू लागला

Next

किती तरी दिवस तो अंथरूणाला खिळला होता. आपलं शरीर थोडंही हलवण्याची शक्ती त्याच्यात नव्हती. एखाद्या जिवंत मूर्तीप्रमाणे तो अंथरूणावरच होता. पण नर्सने असं काही केलं की कित्येक दिवस अंथरूणाला खिळलेला तरुण रुग्ण अचानक अंथरूणातच नाचू लागला. या रुग्णाचा व्हिडीओही समोर आला आहे (Patient recoverd with nurse dance therapy).

तेलंगणाच्या गोलापल्ली गावातील श्रीनिवास यकृताशी आजाराशी झुंज देतो आहे. त्याला करिमनगरमधील मीनाक्षी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात भरती करून २५ दिवस झाले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. पण त्याच्या हातापायाची हालचालच होत नव्हती. त्याच्या हातापायाला लकवा मारल्यासारखं झालं.

अखेर नर्सिंग स्टाफने त्याच्यावर एक एक्स्परिमेंट करायचं ठरवलं. त्यांनी वरिष्ठांकडून परवानगी घेतली. त्यांनी आयसीयूमध्ये असलेल्या श्रीनिवाससमोर फिल्ममधील फास्ट बिट गाणं लावलं आणि त्याच्यासमोर त्या नाचू लागल्या. गाणं ऐकून आणि त्यावर नर्सला नाचताना पाहून श्रीनिवासही उत्साहीत झाला. तोसुद्धा नाचण्याचा प्रयत्न करू लागला. आश्चर्य म्हणजे श्रीनिवासच्याही शरीराची हालचाल होऊ लागली. तो आपले हातपाय हलवू लागला.

या डान्स एक्सपरिमेंट रुग्णाची फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारलं आहे, असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं. श्रीनिवास जसा या एक्स्परिमेंटला पॉझिटिव्ह प्रतिसाद देऊ लागला. तसं त्याला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हसवण्यात आलं. श्रीनिवासवर आता फिझियोथेरेपी सुरू आहे. यामुळे तो लवकरात लवकर बरा होईल असा आशेचा किरण त्याच्या कुटुंबाला दिसला आहे.

Web Title: dance therapy for paralysis patient in Telangana worked video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.