बाबो! रस्त्यावर आली पॉर्श डान्सिंग Scorpio कार’; अन् पोलिसांनी लावला ४१ हजाराचा दंड
By manali.bagul | Published: January 1, 2021 01:18 PM2021-01-01T13:18:33+5:302021-01-01T13:32:46+5:30
Trending Viral News in Marathi : कार पाहून वाहतूक पोलिसांनी तब्बल ४१ हजार ५०० रूपयांचा दंड लावला आहे. विशेष म्हणजे या कारवर जातीचा उल्लेखसुद्धा करण्यात आला होता.
सोशल मीडियावर एका स्कॉर्पीओ कारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत अशी कार तुम्ही कधीही पाहिली नसेल. साधीसुधी नाही तर ही चक्क डान्स करणारी कार आहे. म्हणूनच या कारला सोशल मीडियावर डान्सिंग कार असं म्हटलं जात आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण ही कार पाहून वाहतूक पोलिसांनी तब्बल ४१ हजार ५०० रूपयांचा दंड लावला आहे. विशेष म्हणजे या कारवर जातीचा उल्लेखसुद्धा करण्यात आला होता.
गाज़ियाबाद में इस #DancingCar पर 41,500रु का चालान काटकर पुलिस द्वारा सीज किया गया. गाड़ी पर जातिसूचक शब्द लिखा था.
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 30, 2020
सड़क पर अभद्रता का प्रदर्शन शर्मनाक है.
गाड़ी कस्टमाइज़ करना अच्छी बात है लेकिन ट्रैफिक नियमों के विरुद्ध जाकर, दूसरे राहगीरों को दुख-असुरक्षाबोध कराना गलत है. pic.twitter.com/cfUsaMkVM8
आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी डान्सिंग कारचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. रविवारी उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद पोलिसांकडे काही तरुण रस्त्यावर कर्कश्य आवाजात गाणी वाजवत असून स्टंट देखील करत असल्याची तक्रार आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार नसूम अहमद असं गाडीच्या मालकाचं नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. त्याने आपली स्कॉर्पिओ कस्टमाइज केली होती. आतून-बाहेरुन त्याने गाडी सजवली होती, तसेच मोठमोठे स्पीकरही लावले होते. PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL
चालकाने ब्रेक मारल्यानंतर ही कार जोरानं हलत होती, त्यामुळे बघणाऱ्याला ती डान्सिंग कारप्रमाणे वाटायची. या गाडीच्या दिसण्यामुळे तसंच कर्कश्य आवाजामुळे अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले होते. म्हणूनच उत्तर प्रदेश पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून यानंतर कोणी कार, ट्रॅक्टर किंवा बुलेट अशा प्रकारे सजवल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. New Year 2021 : माहामारीची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं; कसं असेल नववर्ष २०२१