आई-वडिलांपेक्षा वेगळी दिसत होती मुलगी, डीएनए टेस्ट केली; रिपोर्ट पाहून बसला धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 03:55 PM2024-11-05T15:55:13+5:302024-11-05T15:57:02+5:30
तरूणीला तिच्या दिसण्यावरून अनेकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते. तू तुझ्या आई-वडिलांपेक्षा वेगळी दिसते, असं तिला सतत बोललं जात होतं.
परदेशात अलिकडे एका टेस्टचं फारच चलन वाढलं आहे. ही टेस्ट म्हणजे डीएनए टेस्ट. ही टेस्ट करण्यासाठी आधी खूप परवानग्यांची गरज होती. पण आता ही टेस्ट सहजपणे होते. एकमेकांवर जराही संशय आला की, आजकाल लोक लगेच डीएनए टेस्ट करून मोकळे होतात. अनेकदा या टेस्टच्या रिझल्टने काही चांगलं होतं तर कधी कुणाचं जीवन उद्ध्वस्त होतं.
एका तरूणीसोबत असंच झालं. तरूणीला तिच्या दिसण्यावरून अनेकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते. तू तुझ्या आई-वडिलांपेक्षा वेगळी दिसते, असं तिला सतत बोललं जात होतं. अशात एक दिवस तिने डीएनए टेस्ट केली. त्यानंतर तिच्या हाती जो रिझल्ट आला तो बघून तिला धक्का बसला.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, उत्तर चीनमध्ये राहणाऱ्या तरूणीने गंमतीत तिची डीएनए टेस्ट केली. हेनान ब्रॉडकास्टिंग सिस्टमच्या रिपोर्टनुसार, एका २४ वर्षीय तरूणीने सांगितलं की, तिला ऑफिसमधील लोक नेहमीच म्हणत होते की, तू उत्तर चीनमधील वाटतंच नाही. तिचं नाक थोडं मोठं आहे आणि ओठही मोठे आहेत. अशात ती इतरांपेक्षा वेगळी दिसते. ती उत्तर चीनमधील शिनशियांगमध्येच राहिली, पण लोक म्हणतात की, ती दक्षिण चीनमधील दिसते. तरूणीने याबाबत आई-वडिलांना विचारलं तर ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे तरूणीने जेनेटिक टेस्ट केली.
DNA टेस्टमुळे जीवनात वादळ
तरूणीने टेस्ट तर गंमतीत केली होती, पण त्याचा रिझल्ट अजब होता. तरूणीला आढळलं की, तिचा डीएनए आई-वडिलांपेक्षा वेगळा होता. ती गुआंक्शी प्रोविंसशी संबंधित होती. ज्याचा हेनानशी काहीही संबंध नव्हता. जेव्हा यासंबंधी मीडियात बातम्या आल्या तेव्हगा गुआंक्शीच्या एका महिलेने दावा केला की, ही तरूणी तिची मुलगी आहे. जी २४ वर्षाआधी हरवली होती. ही महिला मुलीला भेटायला येण्यास तयार आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेची चर्चा रंगली आहे.