सोनेरी क्षण! IPS वडिलांना मुलीने थेट IPS होऊन केलं सॅल्यूट; बाप-लेकीचा हृदयस्पर्शी Video
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:43 AM2023-02-15T11:43:17+5:302023-02-15T11:49:14+5:30
आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं वेगळे स्थान निर्माण करावं, ओळख मिळवावी असं प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं.
आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं वेगळे स्थान निर्माण करावं, ओळख मिळवावी असं प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं असं म्हणतात. जेव्हा मुलगा किंवा मुलगी आत्मनिर्भर होतात तो क्षण हा वडिलांसाठी खूप अभिमानाचा क्षण असतो. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आयपीएस अधिकारी जीपी सिंह यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला असून सध्या तो व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
आयपीएस जीपी सिंह यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांची मुलगी ऐश्वर्या सिंहने त्यांना सलाम केलं आहे. यावेळी त्यांनी लिहिलं की, "आज हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून उत्तीर्ण झाल्याबद्दल माझ्या मुलीने मला सलाम केला. या क्षणाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत."
Words fail me. Received the salute from daughter @aishwarya_ips as she passed out of @svpnpahyd today. Picture courtesy @lrbishnoiipspic.twitter.com/aeHoj9msYG
— GP Singh (@gpsinghips) February 11, 2023
ट्विटरवर आतापर्यंत दोन लाख 66 हजारांहून अधिक लोकांनी आयपीएस जीपी सिंह यांचा हा व्हिडीओ पाहिला आहे. याच दरम्यान, व्हिडिओला दहा हजारापेक्षा जास्त वेळा लाईक केले गेले आणि 832 वेळा रिट्विट केले गेले. अनेक युजर्सनी वडील-मुलीचे अभिनंदन करत हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटले आहे.
समीरन मिश्रा यांनी लिहिलं आहे की, किती सुंदर क्षण! डॉ. जुरी शर्मा बोरदोलोई यांनी लिहिले - पालकांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण! मनन भट्ट यांनी लिहिले - जय हिंद सर, वडिलांसाठी यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण असूच शकत नाही. कमलिका सेनगुप्ता यांनी ग्रेट असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"