David Warner Video: डेव्हिड वॉर्नरची 'स्टायलिश' फाईट, पण खरा हिरो कोण? फॅन्सना 'चॅलेंज'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:45 PM2022-07-26T17:45:43+5:302022-07-26T17:48:48+5:30
पाहा, तुम्हाला ओळखता येतोय का फिल्मचा हिरो?
David Warner Video: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर कायम चाहत्यांचे सोशल मीडियावर मनोरंजन करताना दिसतो. बॉलिवूड असो किंवा दाक्षिणात्य चित्रपट असो, वॉर्नर त्या चित्रपटातील ट्रेंडिंग गोष्टींशी संबंधित काही ना काही सोशल मीडियावर पोस्ट करत राहतो. त्याने मधल्या काळात पुष्पा चित्रपट हिट झाला असताना त्यातील बरेच छोटे मोठे व्हिडीओ स्वत:चा चेहरा लावून पोस्ट केले होते. तसेच काही दिवसानंतर KGF-2 या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'रॉकी भाई'च्या अवतारातही डेव्हिड वॉर्नर दिसला होता. पण आता मात्र डेव्हिड वॉर्नर एका जुन्या साऊथ इंडियन चित्रपटातील अँक्शन सीन मजेशीर पद्धतीने साकारताना दिसतोय.
व्हिडीओमध्ये नक्की काय?
डेव्हिड वॉर्नरने एका चित्रपटातील व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने हिरोच्या चेहऱ्याच्या जागी स्वत:चा चेहरा लगावला आहे. या व्हिडीओ सीन मध्ये डेव्हिड वॉर्नरचा चेहरा लावलेला हिरो खलनायकाच्या गँगची धुलाई करताना दिसत आहे. या व्हिडीओला लाईक्स तर मिळाले आहेतच. पण वॉर्नरने या व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. वॉर्नरने नक्की कोणत्या दाक्षिणात्य हिरोच्या जागी स्वत:चा चेहरा लावला आहे, असा प्रश्न त्याने चाहत्यांसाठी विचारला असून त्यावर अनेकांनी बरोबर उत्तरे दिली आहेत. पाहा तुम्हाला माहितीये का हा चित्रपट आणि त्या चित्रपटाचा हिरो? पाहा व्हिडीओ-
डेव्हिड वॉर्नर सतत विविध अभिनेत्यांचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. कोरोना काळात वॉर्नरने असे मजेशीर व्हिडीओ पोस्ट करून साऱ्यांचेच मनोरंजन केले होते. सनरायजर्स हैदराबादमधून खेळताना तो दाक्षिणात्य चित्रपटांचा फॅन होता. पण नंतर दिल्लीच्या संघाकडे गेल्यानंतरही त्याचं साऊथच्या चित्रपटांचे वेड अद्याप कमी झालेलं नाही. तो अजूनही त्या चित्रपटातील छोटे छोटे व्हिडीओ शोधून त्यावर व्हिडीओ पोस्ट करत असतो. दरम्यान, आजचा व्हिडीओ हा साऊथ स्टार अलू अर्जुन ( Allu Arjun ) याच्या अला वैकुंठपुरमलो ( Ala Vaikunthapurramuloo ) या चित्रपटातील आहे. त्यावर वॉर्नरने स्वत:चा चेहरा लावून धमाल व्हिडीओ पोस्ट केला आहे.