कोरोनामुळे एका व्यक्तीचा २ वेळा मृत्यू; तिरडीवर ठेवताच श्वास घेऊ लागला, मग त्याच एम्ब्यूलेंसनं रुग्णालय गाठलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 05:36 PM2021-05-12T17:36:36+5:302021-05-12T17:45:02+5:30
Dead corona patient started breathing : नातेवाईकांना पल्स मीटर लावून पाहिल्यानंतर दिसलं की पल्स लेव्हल ८० होती.
एकाच दिवशी एका माणसाचा दोनवेळा मृत्यू झाल्याची घटना ग्वाल्हेरमधून समोर येत आहे. नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर हा तरूण पुन्हा एकदा जीवंत झाला. तिरडीवर शव ठेवल्यानंतर अचानक या माणसाच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि आणि तोंडातून फेस येऊ लागला. त्याचवेळी लगेचच नातेवाईकांना पल्स मीटर लावून पाहिल्यानंतर दिसलं की पल्स लेव्हल ८० होती.
त्यानंतर, कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला. मग कुटुंबातील लोक त्याला घेऊन रुग्णालयाच्या दिशेनं जाऊ लागले. जवळपास ५ रुग्णालयं फिरूनही रुग्णाला कोणीही भरती करून घेतलं नाही. त्यानंतर कुटुंबिय JAH घेऊन पोहोचले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर काहीवेळ ऑक्सिजन लावला. काही वेळानंतर डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केलं. ही घटना मुरारच्या कृष्णपुरी परिसरातील आहे.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
मुरार येथील कृष्णापुरी येथे राहणारा 26 वर्षीय आयुष श्रीवास्तव मुंबईच्या कंपनीत कामाला होता. तिथली कोरोना परिस्थिती अधिकच बिघडली तेव्हा कंपनीने घरून काम करण्यास सांगितले. त्यावेळी आयुष आपले सामान बांधून ग्वाल्हेरच्या घरी आला. तो इथूनच काम करत होता. काही दिवसांपूर्वी अचानक आयुषची प्रकृती खालावली. कुटुंबियांनी 3 मे रोजी आयुषला खासगी केडीजे रुग्णालयात दाखल केले. आज 11 मे, मंगळवारी सकाळी 10 वाजता आयुष यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आधी जीभ खाल्ली मग स्वतःची जागा मिळवली; माश्याच्या तोंडात आढळला लिंग बदलणारा किडा
डॉक्टरांना मृत घोषित होताच आयुषच्या घरात शोककळा पसरली. मृतदेह घेऊन कुटुंबीय घरी पोहोचले. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी येथे सुरू झाली. मृतदेह तिरडीवर ठेवण्यात आला. तेव्हा अचानक आयुष हसू लागला. हे पाहून कुटुंबिय आश्चर्यचकित झाले. हळूहळू त्याला श्वाससुद्धा घेता येऊ लागला. त्यावेळी घरातील लोक आयुषला पुन्हा रुग्णलयात घेऊन पोहोचले. डॉक्टरांनी ऑक्सिजन वाढवण्याचा प्रयत्न केला पण याचा काहीही परिणाम झाली नाही. डॉक्टरांनी ४ वाजता पुन्हा आयुषला मृत घोषित केले.