तरुणी प्रियकरासह पळून गेली, कुटुंबाने तिला मृत घोषित केले, शोकसंदेश छापला; धक्कादायक प्रकार आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 10:38 AM2023-06-05T10:38:30+5:302023-06-05T10:39:26+5:30
एका कुटुंबाने जीवंत तरुणीला मृत घोषीत केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
सध्या प्रेमविवाहच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या असंच एक प्रकरण राजस्थानमधून समोर आलं आहे. राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील एक तरुणी आपल्याच जातीतील तरुणासोबत पळून जाते. मुलीच्या कुटुंबियांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केला.काही दिवसांनी मुलगी सापडते, तिला पोलीस ठाण्यात कुटुंबियांसमोर उभ केलं जात. फण, ती तरुणी आपल्या कुटुंबियांना ओळख दाखवत नाही. माझा आणि यांचा काही संबंध नसल्याचे ती पोलिसांना सांगते. मुलीचा हा जबाब पाहूबन कुटुंबियांना धक्का बसला, यानंतर घरच्यांनी उचलल्या पाऊलाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
ऑफिस वेळेत रोज ६-६ तासांचा ‘टॉयलेट ब्रेक’; कर्मचाऱ्याला कंपनीपाठोपाठ कोर्टाचाही दणका
पोलिसांसमोर तरुणीने कुटुंबीयांना ओळखण्यास नकार दिला आणि ती तरुणासोबत गेली. मुलीच्या या निर्णयामुळे कुटुंबीय इतके दुखावले की त्यांनी आपल्या मुलीला मृत समजत मोठा निर्णय घेत तिच्या नावाने शोकसंदेश छापला आहे. यामध्ये लोकांना मुलीच्या मृत्यूनंतर कार्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ओळखीचे आणि नातेवाइकांपर्यंत कार्ड पोहोचवण्यात आले आहेत. त्याचबरोबर कुटुंबीयांच्या या निर्णयाची आणि शोकसंदेश असलेल्या कार्डचीही सोशल मीडियावर चर्चा आहे.
कार्डचा फोटो व्हायरल होत आहे. त्यात मुलीचा फोटो छापलेले आहे. जिवंत मुलगी मृत असल्याचे सांगण्यात आले. रतनपुरा गावातील प्रिया जाट तिच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध तिच्या पसंतीच्या तरुणासह पळून गेल्याची घटना समोर आली. यावरून नातेवाइकांनी हमीरगड पोलीस ठाण्यात प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रियाला शोधून तिच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत तिच्याशी बोलले असता, तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना ओळखण्यास स्पष्ट नकार दिला आणि प्रियकरासोबत निघून गेली.
यानंतर कुटुंबीयांनी सांगितले की, आमची मुलगी मरण पावली आहे आणि तिचा शोकसंदेश छापून आला आणि त्यात प्रियाचा मृत्यू होणार असल्याचे लिहिले. शोकसंदेशात प्रियाचा मृत्यू १ जून २०२३ रोजी होईल असे लिहिले होते आणि कार्याची तारीख १३ जून ठेवण्यात आली असल्याची लिहिले आहे. या कार्डची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.