VIDEO : एकाच तलावात पाणी पिताना दिसले हरिण आणि बिबट्या, बघा पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 04:08 PM2022-05-16T16:08:24+5:302022-05-16T16:11:33+5:30

Deer And Leopard Video:   या व्हिडीओ एक बिबट्या आणि एक हरिण एकाच तलावात पाणी पिताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

Deer and leopard were seen drinking water in same pond watch video | VIDEO : एकाच तलावात पाणी पिताना दिसले हरिण आणि बिबट्या, बघा पुढे काय झालं...

VIDEO : एकाच तलावात पाणी पिताना दिसले हरिण आणि बिबट्या, बघा पुढे काय झालं...

Next

Deer And Leopard Video:  जंगलाचे आपले नियम आणि कायदे असतात. त्यांचं पालन झालं नाही तर संतुलन बिघडतं. सध्या जंगलातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओ एक बिबट्या आणि एक हरिण एकाच तलावात पाणी पिताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. लोकांना प्रश्न पडला आहे की, बिबट्या हरणावर हल्ला का करत नाहीये? 

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन कमजोर प्राणी आणि एक शिकारी प्राणी शांतपणे एकत्र एकाच तलावातील पाणी पित आहेत. व्हिडीओ बघून कुठेच वाटत नाहीये की, बिबट्या त्या हरणांची शिकार करण्यात इंटरेस्टेड आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हरणांनाही बिबट्याची भिती वाटत नाहीये. हे  लोकांना अजब वाटत आहे.

हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा ने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केलाय. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन हरिण न घाबरता बिबट्यासोबत पाणी पित आहेत. यादरम्यान ना शिकारी बिबट्या शिकारीच्या मूडमध्ये आहे ना हरिण घाबरलेले आहेत. IFS अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की,, ‘Wild animals never kill for sport’. याचा अर्थ होतो की, जंगली प्राणी खेळासाठी शिकार करत नाहीत.

IFS अधिकाऱ्याना व्हिडीओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की, प्राण्यांना शिकारीची गरज असते तेव्हाच ते शिकार करतात. असं नाहीये की, ते सतत इतर प्राण्यांची शिकार करत बसतात. जर त्यांना भूक नसेल तर ते कोणत्याही प्राण्याला नुकसान पोहोचवत नाहीत. सोशल मीडियावर या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
 

Web Title: Deer and leopard were seen drinking water in same pond watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.