रामकृष्ण हरि! हरिनामाच्या घोषात हरिणही तल्लीन, बालगोपाळांसह धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 05:19 PM2023-05-21T17:19:02+5:302023-05-21T17:23:12+5:30
Viral Video: हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video: हळूहळू वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी आषाढी वारीची तयारी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. हरिनामाची गोडी आणि ताकद कितीही वर्णन केली तरी कमीच आहे. लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात हजारो किमीचा प्रवास करत असतात. हरिनामात तल्लीन झालेला व्यक्ती काही काळासाठी का होईना आपले दुःख, विवंचना, समस्या विसरून जातो. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यात चक्क एक हरिण हरिनामाच्या तालावर ठेका धरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हरिनामाच्या गजर सुरू आहे. बालगोपाळ आणि काही तरुण मंडळी हरिनामाचा गजर करत आहेत. यातच त्यांच्यापाशी एक हरिण येते आणि हरिनामाच्या तालावर ठेका धरते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. टाळ वाजवत लहान मुले आणि काही तरुण मंडळी रामकृष्ण हरि नामाचा गजर करताना दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला व्हिडिओ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा व्हिडिओ ट्विटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला रामकृष्ण हरि, असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओत लहान मुले आणि काही तरुण मंडळी जय जय राम कृष्णहरि असा गजर करताना दिसत आहेत. काहींच्या हातात टाळ आहेत. ही मंडळींनी जय जय राम कृष्णहरिच्या गजरात तल्लीन होऊन ताल धरला आहे. याचवेळी तेथे एक हरिण येते आणि तेही या मंडळींसोबत जय जय राम कृष्णहरीच्या तालावर ठेका धरते, असे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, हरिणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे मात्र समजू शकलेले नाही.
राम कृष्ण हरी…! 😍🙏🏽 pic.twitter.com/eqtu4M5aaC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 21, 2023