समुद्राच्या मध्यभागी पोहताना सापडलं हरण; पण ते तिकडे पोहोचलं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 03:03 PM2019-11-07T15:03:18+5:302019-11-07T15:04:28+5:30
अमेरिकेतील Harrington, Maine मध्ये एक घटना घडली आहे. येथील काही मच्छिमार समुद्राच्या मध्यभागी मासे पकडण्यासाठी गेले होते.
अमेरिकेतील Harrington, Maine मध्ये एक घटना घडली आहे. येथील काही मच्छिमार समुद्राच्या मध्यभागी मासे पकडण्यासाठी गेले होते. ते मासे पकडण्यासाठी जाळं टाकणार तेवढ्यात त्यांना समुद्राच्या मधोमध काहीतरी पोहत असल्याचे दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा ते एक हरिण होतं. त्याला पाहताच क्षमी त्या मच्छिमारांना एक प्रश्न पडला की, हे हरिण समुद्राच्या मध्यभागी पोहोचलं कसं?
Shawn Dowling, Jared Thaxter आणि Ren Dorr आपली बोट हरणाजवळ घेऊ गेले आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं.
मासे पकडण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना हे हरण समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर सापडलं. येथे लाटा फार वेगाने येत होत्या आणि त्या लाटांसोबत हरिणही हेलकावे खात होतं. जेव्हा त्यावा पाण्यातून बाहेर काढलं त्यावेळी ते फार घाबरलेलं होतं.
6 हजार लोकांनी शेअर केली पोस्ट
Ren dorr ने आपल्या फेसबुक पेजवर या रेस्क्यू मिशनचे फोटो शेअर केले आहेत. बातमी लिहिपर्यंत पोस्ट जवळपास 6 हजार लोकांनी शेअर केली आहे.
हरणाला समुद्र किनाऱ्याजवळ सोडलं
मच्छिमारांनी हरणाला वाचवले आणि समुद्र किनाऱ्यावर जाऊन सोडलं. तुम्हाला माहीत आहे का? हरणं समुद्रात सहज पोहू शकतात पण एवढ्या आतपर्यंत म्हणजेच, मच्छिमारांनी सांगितल्यानुसार, जवळपास 8 किलोमीटर अंतरापर्यंत पोहत जाणं अशक्य आहे.