पोलिसांनी घडवली अद्दल; 3 Idiot चित्रपटातील सीनवर रिल बनवणाऱ्याला 17 हजारांचे चालान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 05:39 PM2023-07-28T17:39:46+5:302023-07-28T17:40:31+5:30

Bike Challan News: हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. एकदा पाहाच...

Delhi Bike Challan News: Police issued 17 thousand challan to the reel maker on the scene of the movie 3 Idiot | पोलिसांनी घडवली अद्दल; 3 Idiot चित्रपटातील सीनवर रिल बनवणाऱ्याला 17 हजारांचे चालान

पोलिसांनी घडवली अद्दल; 3 Idiot चित्रपटातील सीनवर रिल बनवणाऱ्याला 17 हजारांचे चालान

googlenewsNext

Delhi Traffic Challan: इन्स्टाग्राम रील्स बनवण्यासाठी अनेकजण कुठल्याही थराला जातात. व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालायलाही तयार असतात. असाच एक व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. त्याने 3 इडियट चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला, यात एक पुरुष आणि दोन महिला विनाहेल्मेट टू-व्हिलर चालवताना दिसल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीपोलिसांनी विविध कलमांतर्गत एकूण ₹17000 चा दंड ठोठावला.

मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण आमिर खानच्या '3 इडियट्स' चित्रपटातील लोकप्रिय सीन रिक्रिएट करत होता. या सीनमध्ये आमिर खान त्याच्या मित्रासोबत हॉस्पिटलमध्ये जात असतात आणि स्कूटरवर तीनजण बसलेले असतात. हा सीन करताना त्या व्यक्तीने बाईकवर दोन महिलांना बसवले आणि ती रील इंस्टाग्रामवर टाकली. तिघेही हेल्मेटशिवाय रॉयल एनफिल्ड मोटारसायकल चालवताना दिसले.

या रिलमध्ये 3 इडियट्सचे 'जाने नही देंगे तुझे' हे गाणे वाजत होते. या प्रकरणाची दखल घेत दिल्ली पोलिसांनी या व्यक्तीवर चालान जारी केले आहे. तसेच, हीच रिल शेअर करत चालानशिवाय जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे. त्या व्यक्तीला एकूण 17,000 रुपयांचे चालान देण्यात आला. 

या कलमांतर्गत चालान लावले:
बाईक ट्रिपल सीट चालवणे : 1000 रुपये दंड
हेल्मेटशिवाय चालवणे: 1000 रुपये दंड
परवान्याशिवाय चालवणे: 5,000 रुपये दंड
वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) शिवाय चालवणे: 10,000 रुपये दंड

Web Title: Delhi Bike Challan News: Police issued 17 thousand challan to the reel maker on the scene of the movie 3 Idiot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.