काय सांगता! Zomato'वरुन २८ लाखांच मागवले जेवण; कंपनीने दिले कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:12 PM2022-12-29T15:12:22+5:302022-12-29T15:12:32+5:30
वर्ष २०२२ संपत आले आहे. काही दिवसातच २०२३ हे वर्ष सुरू होईल. या पार्श्वभूमिवर सर्व कंपन्या याद्या जाहीर करत आहेत. यात कोणी फिरण्याचे रेकॉर्ड बनवले तर कोणी खाण्या पिण्याचे रोकॉर्ड बनवले.
वर्ष २०२२ संपत आले आहे. काही दिवसातच २०२३ हे वर्ष सुरू होईल. या पार्श्वभूमिवर सर्व कंपन्या याद्या जाहीर करत आहेत. यात कोणी फिरण्याचे रेकॉर्ड बनवले तर कोणी खाण्या पिण्याचे रोकॉर्ड बनवले. तर काही कंपन्यांनी देशात सर्वात जास्त काय खाण्यासाठी मागवले जाते याची यादी जाहीर केली आहे. सध्या सोशल मीडियावर Zomato कंपनीची एक यादी व्हायरल झाली आहे. यात एका ऑर्डरची चांगलीच चर्चा सुरू आहे.
Zomato च्या 2022 च्या वार्षिक अहवालानुसार, एका व्यक्तीने 3300 पेक्षा जास्त ऑर्डर दिल्या आहेत. या ऑर्डर दिल्लीत राहणाऱ्या अंकुर नावाच्या व्यक्तीने दिल्या आहेत.
अंकुरने यावर्षी 3300 ऑर्डर करून विक्रम केला आहे. त्याला आता Zomato ने "देशातील सर्वात मोठे खाद्यपदार्थ" म्हणून घोषित केले आहे. एका वर्षात 365 दिवस असतात. एका दिवसात त्या व्यक्तीने सरासरी 9 ऑर्डर दिल्या. अंकुरने यावर्षी 28 लाख 59 हजार रुपयांचे खाद्यपदार्थ ऑर्डर केले.
झोमॅटोच्या अहवालात डिलिव्हरी अॅपवर कोणत्या शहराने सर्वाधिक प्रोमो कोड वापरला याचाही उल्लेख केला आहे. पश्चिम बंगालमधील रायगंज शहरातील लोकांनी जास्तीत जास्त प्रोमो कोडचा वापर केला. या शहरातील लोकांनी 99.7 टक्के ऑर्डरवर प्रोमो कोड वापरला.
उशांवर डाग पडले, खराब झाल्या? न धुताही होतील स्वच्छ... करून बघा ३ सोपे उपाय
याशिवाय, झोमॅटोच्या रिपोर्टमध्ये हे देखील सांगण्यात आले होते की डिस्काउंटमध्ये सर्वात जास्त पैसे कोणी वाचवले. मुंबईतील एका व्यक्तीने वर्षभरात ऑर्डरवर 2 लाख 43 हजार रुपये वाचवले. दुसरीकडे, जेवण ऑर्डर करण्याबद्दल बोलायचे तर, देशात दर मिनिटाला 186 वेळा बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली. सर्वाधिक खाद्यपदार्थांच्या ऑर्डरमध्ये पिझ्झा दुसऱ्या क्रमांकावर होता. लोकांनी दर मिनिटाला 139 पिझ्झाची ऑर्डर दिली.
यापूर्वीही अशीच एक यादी फूड डिलिव्हरी अॅप स्विगीनेही जारी केली होती. यावर्षी देशात सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर करण्यात आली आहे.
झोमॅटोने इंस्टाग्रामवर या वर्षाच्या अहवालावर एक पोस्ट शेअर केली आहे. अंकुर हे नाव पाहून बिझनेसमन अंकुर वारीकूने पोस्टवर कमेंट केली. "तुमचे स्वागत आहे," ही कमेंट पाहून लोक अंदाज बांधू लागले की यावर्षी अंकुर वारीकूने 3300 ऑर्डर दिल्या आहेत. वारीकूच्या या कमेंटवर झोमॅटोनेही उत्तर दिले आहे.