"मला भीती वाटतं नाही, माझ्यासोबत तर काहीच नाही झालं"; मेट्रो बिकिनी गर्लचा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 04:16 PM2023-04-05T16:16:07+5:302023-04-05T16:20:42+5:30

ब्रालेट आणि स्कर्ट घालून मेट्रोतून प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

delhi metro bikini girl rhythm chanana says i dont scared nothing happens with me | "मला भीती वाटतं नाही, माझ्यासोबत तर काहीच नाही झालं"; मेट्रो बिकिनी गर्लचा नवा दावा

"मला भीती वाटतं नाही, माझ्यासोबत तर काहीच नाही झालं"; मेट्रो बिकिनी गर्लचा नवा दावा

googlenewsNext

छोट्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर एक तरुणी खूप ट्रोल होत आहे. ब्रालेट आणि स्कर्ट घालून तिने मेट्रोतून प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या मुलीचं नाव रिदम असं आहे. तिची छेड काढण्याची कोणाची हिंमत होत नाही. त्यामुळेच भीती वाटत नसल्याचं रिदमने म्हटलं आहे. कपडे ही एक प्रोसेस असल्याचं ती म्हणते.

रिदमला आता हळूहळू  स्वातंत्र्याची जाणीव होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून असेच कपडे वापरत आहे. पण हे सगळं प्रसिद्ध होण्यासाठी करत नसल्याचं तरुणीने म्हटलं आहे. महिला सुरक्षेबाबत तिला प्रश्न विचारला तेव्हा तिने मी रोज असेच कपडे घालते पण माझ्यासोबत काहीच झालं नाही असं म्हटलं आहे. तसेच अजिबात भीती वाटत नसल्याचं देखील सांगितलं. 

छेडछाडी बद्दल विचारताच रिदमने मला याचा फरक पडत नाही, मी हे पूर्णपणे इग्नोर करते असं म्हटलं आहे. अनेकदा लोक धमकी देतात पण ते काहीतरी करतीय एवढी त्यांच्याच हिंमत नाही असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. कपड्यांचा विरोध करणाऱ्यांवर हसू येतं बोल्डनेस फक्त कपड्यातून येत नाही. हा एक एटीट्यूड असल्याचं रिदम सांगते. 

जर तुमच्याकडे बोल्डनेसवाला एटीट्यूड असेल तर कोणीच काही करू शकत नाही. दिल्लीमध्ये प्रवास करायला भीती वाटत नाही. पिंक लाईनवर थांबवतात. पण नंतर ब्लू लाईनवर एंट्री मिळते असंही तरुणीने म्हटलं आहे. सध्या या मुलीची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: delhi metro bikini girl rhythm chanana says i dont scared nothing happens with me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.