दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लनंतर आता 'ही' महिला झाली व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 14:55 IST2023-04-06T14:54:42+5:302023-04-06T14:55:05+5:30
दिल्ली मेट्रोमध्ये रेड कलरच्या साडीत एक महिला डान्स करत असताना दिसली आहे, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लनंतर आता 'ही' महिला झाली व्हायरल
काही दिवसापूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये एका तरुणीने बिकीनीवर प्रवास केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी त्या तरुणीला ट्रोलही करण्यात आले होते. आता दिल्ली मेट्रोमध्येच एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये ती भोजपुरी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. या महिलेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ अवनिकरीश नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती महिला लाल रंगाची साडी नेसून दिल्ली मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर भोजपुरी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. महिला खेसारी लाल यादव आणि प्रियंका सिंह यांच्या गाण्यावर डान्स करत आहे.
स्कूटीस्वार महिलेच्या मागे लागले कुत्रे; चाव्यापासून बचावली, पण कारला जाऊन धडकली- पाहा VIDEO
आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एक महिन्यापूर्वीचा आहे. गेल्या काही दिवसापूर्वी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.