जीवघेणी स्टंटबाजी कशाला?  दिल्लीच्या रस्त्यांवर स्टंटबाज मोकाट; अपघाताचा 'VIDEO' होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 01:33 PM2023-12-14T13:33:47+5:302023-12-14T13:36:32+5:30

दिल्लीच्या रस्त्यावर तरूणाची स्टंबाजीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटाच येईल. 

delhi signature bridge younsters danerous stunt  video goes viral on social media  | जीवघेणी स्टंटबाजी कशाला?  दिल्लीच्या रस्त्यांवर स्टंटबाज मोकाट; अपघाताचा 'VIDEO' होतोय व्हायरल

जीवघेणी स्टंटबाजी कशाला?  दिल्लीच्या रस्त्यांवर स्टंटबाज मोकाट; अपघाताचा 'VIDEO' होतोय व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर दररोज मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत असतात. रिल्सच्या माध्यमातून  प्रसिद्ध होण्याचा हा नवा फंडा आहे असा अनेकांचा समज आहे. या सोशल मीडियावर क्षणिक प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अशाच एका व्हिडीओने सर्वसामान्यांच लक्ष वेधलं आहे. 

हल्ली सोशल मीडियावर तरुण-तरुणींचे  व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी ही तरूण मंडळी काहीही करू शकते. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ  नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे. 

दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर एका तरूणाचा स्टंबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चालत्या ऑटो रिक्षातून हा तरूण स्टंटबाजी करत आहे. असे जीवावर बेतणारे साहस करून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीसुद्धा ही तरूणाई त्यातून काही बोध घेत नाही. 

व्हायरल व्हिडीओमध्ये चालत्या ऑटो रिक्षामधून भर रस्त्यावर आजुबाजुला धावणाऱ्या वाहनांना हा तरूण स्पर्श करताना दिसत आहे. त्याच्या या अल्लडबाजीची किंमत ऑटो रिक्षाच्या मागुन येणाऱ्या सायकल स्वाराला मोजावी लागली. ऑटो रिक्षामध्ये स्टंट करणारा हा तरूण त्या सायकलस्वाराला धडकतो. त्यामुळे तो सायकलस्वार भर रस्त्यावर सायकलवरून खाली पडतो. या अपघातात त्या सायकलस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे.  

दरम्यान, सोशल मीडियावर एका यूजरने हा व्हिडीओ इस्टाग्रामवर शेअर केला आहे . शिवाय या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 


येथे पाहा व्हिडीओ :

Web Title: delhi signature bridge younsters danerous stunt  video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.