म्हणे, दारू अंदर, कोरोना बाहेर; 'त्या' आंटीचं अरविंद केजरीवालांना भलतंच 'सजेशन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 04:09 PM2021-04-27T16:09:04+5:302021-04-27T16:10:08+5:30

दिल्लीतील लॉडडाऊननंतर दारूच्या दुकानासमोरील रांगेत दिसलेल्या महिलेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून तिने अरविंद केजरीवालांकडे मागणी केली आहे.

Delhi viral video of alcohol aunty dolly demand to open liquor shop | म्हणे, दारू अंदर, कोरोना बाहेर; 'त्या' आंटीचं अरविंद केजरीवालांना भलतंच 'सजेशन'

म्हणे, दारू अंदर, कोरोना बाहेर; 'त्या' आंटीचं अरविंद केजरीवालांना भलतंच 'सजेशन'

googlenewsNext

दिल्लीमध्ये ज्या दिवशी लॉकडाऊन लागलं त्या दिवशी दारूंच्या दुकानावर मोठी गर्दी झाली होती. लोकांनी मोठी रांगच रांग लावली होती. याच रांगेत शिवपुरीची एक ५८ वर्षीय डॉली नावाची महिलाही होती. तिचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. ज्यात ती बरळली होती की, 'मी ३५ वयापासून दारू पिते. या महामारीत इंजेक्शनने नाही तर दारूने फायदा होईल'.

आता याच महिलेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात या महिलेने चक्क दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारूची दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. कोरोनाने हजारो लोकांचे जीव जात असताना ती बरळली की, हॉस्पिटलमध्ये जे बेड आणि ऑक्सीजन कमी पडत आहे. त्या समस्येचं समाधान आहे दारूचं दुकान. दोन पेग कुणी लावले तर कोरोना मरेल. पेग आत जाईल तर कोरोना बाहेर येईल'. अशी मागणी करत या बाईने पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. 

ही महिला म्हणाली की, जर दारूची दुकाने सुरू झाली तर हॉस्पिटलमधील बेड रिकामे होतील आणि केजरीवाल सरकारला अडचणी येणार नाही. ऑक्सीजन सिलेंडरची समस्या दूर होईल. पिणाऱ्या लोकांच्या आत दारू गेली तर कोरोना आपोआप बरा होईल, असंही मूर्खासारखं लॉजिक या महिलेने दिलं. तसेच ती म्हणाली की, ती लॉकडाऊन दरम्यान रोज पेग घेते. पण आता स्टॉक संपला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अरविंद केजरीवाल यांनी अपील करत महिला म्हणाली की, तुम्ही दारूची दुकाने सुरू करा. लोक वाचतील. तुमची डोकेदुखी कमी होईल. दारू आत गेली तर कोरोना बाहेर येईल. 

दरम्यान, कोरोना महामारी वाढत्या वेगाला रोखण्यासाठी दिल्ली सीएम अरविंद केजरीवालने एक आठवड्याच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. या आदेशानंतर दारूच्या दुकानांसमोर मोठी गर्दी जमली होती. लोकांच्या रांगेत ही ५८ वर्षीय महिलाही होती. तेव्हाही ही महिला बरळली होती की, वॅक्सीन किंवा इंजेक्शन नाही तर दारूने कोरोना नष्ट होईल. त्यानंतर तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
 

Web Title: Delhi viral video of alcohol aunty dolly demand to open liquor shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.