ग्राहकाने ऑर्डर केलेले जेवण डिलिव्हरी बॉयच खात होता; कॅमेऱ्यातून प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:44 PM2022-03-25T12:44:20+5:302022-03-25T12:45:21+5:30

डिलिव्हरी बॉयने केलेला हा प्रकार दरवाजावर लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडिओ त्या व्यक्तीने शेअर केला आहे. 

delivery boy was eating food ordered by the customer viral video | ग्राहकाने ऑर्डर केलेले जेवण डिलिव्हरी बॉयच खात होता; कॅमेऱ्यातून प्रकार उघड

ग्राहकाने ऑर्डर केलेले जेवण डिलिव्हरी बॉयच खात होता; कॅमेऱ्यातून प्रकार उघड

googlenewsNext

जेव्हा तुम्ही जेवणाची ऑर्डर देता तेव्हा डिलिव्हरी बॉय लवकरात लवकर तुमच्यापर्यंत जेवण पोहोचवतो. पण डिलिव्हरी बॉय तुमचे ऑर्डर केलेले जेवण स्वत: खात असल्याचे तुम्हाला कळले तर? असाच एक प्रकार समोर आला असून, ऑर्डर करण्यात आलेले खाद्यपदार्थ डिलिव्हरी करतेळी खाताना एका डिलिव्हरी बॉयला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एका व्यक्तीने असा दावा केला की, त्याने डिलिव्हरी बॉयला ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ खाताना पाहिले आहे. डिलिव्हरी बॉयने केलेला हा प्रकार दरवाजावर लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडिओ त्या व्यक्तीने शेअर केला आहे. 

'द सन'च्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये राहणारा 36 वर्षीय पेकिश नाइफ स्टोरर यांनी सांगितले की, त्यांनी रात्री जवळच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केले होते, पण ऑर्डर दिल्यानंतर काही वेळातच डिलिव्हरी बॉय तीन चिकन रॅप, एक ग्रिल्ड चिकन बर्गर, चिप्सची चार पाकिटे आणि चार पेय घेऊन तो घरी पोहोचला. मात्र, ऑर्डर देण्यापूर्वी त्याने बॅगमधून चिप्स काढल्या आणि खायला सुरुवात केली. डोरबेलमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात डिलिव्हरी बॉयचा हा प्रकार कैद होत होता. पेकिश नायफ हे डिलिव्हरी बॉयचा हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये पाहत होते.

पेकिश नायफ यांनी सांगितले की, डिलिव्हरी बॉयचा हा प्रताप पाहून मी माझ्या पत्नीला फोन करून माहिती दिली. हे ऐकून पत्नीलाही आश्चर्य वाटले. दरम्यान, पेकिश नायफ यांनी रेस्टॉरंटमध्ये तक्रार केल्यानंतर माफी मागितली. तसेच, डिलिव्हरी बॉयने बॅगमधून बिस्किटे खात असल्याचे सांगितले. यानंतर  रेस्टॉरंटच्यावतीने सांगण्यात आले की, त्यांनी डिलिव्हरी बॉयवर कारवाई केली आहे.

Web Title: delivery boy was eating food ordered by the customer viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.