भारतातील एक असं गाव जिथे मातीच्या घरात राहतात कोट्याधीश लोक, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 04:14 PM2024-10-10T16:14:09+5:302024-10-10T16:24:34+5:30

या गावातील सगळेच लोक मातीच्या घरांमध्ये राहतात. केवळ गरीबच नाही तर गावातील कोट्याधीश लोकही मातींच्या घरात राहतात. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Deomali village Rajasthan everyone lives in mud house | भारतातील एक असं गाव जिथे मातीच्या घरात राहतात कोट्याधीश लोक, कारण...

भारतातील एक असं गाव जिथे मातीच्या घरात राहतात कोट्याधीश लोक, कारण...

भारतातील लोक हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या मान्यतांचं पालन करतात. येथील वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये वेगवेगळे रिती-रिवाज बघायला मिळतात. हे रिती-रिवाज अनेकांसाठी अंधविश्वासही ठरू शकतात. मात्र, ही ठिकाण लोकांसाठी फारच खास असतात. असंच एक गाव राजस्थानमध्ये आहे. या गावातील सगळेच लोक मातीच्या घरांमध्ये राहतात. केवळ गरीबच नाही तर गावातील कोट्याधीश लोकही मातींच्या घरात राहतात. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

@ask_bhai9 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो राजस्थानमधील एका गावातील आहे. या गावाचं नाव देवमाली असून ब्यावर जिल्ह्यातील आहे. या गावाची खासियत म्हणजे इथे सगळे लोक मातीच्या घरांमध्ये राहतात. जे लोक श्रीमंत आहेत, कोट्याधीश आहेत ते सुद्धा सिमेंटच्या बिल्डींगमध्ये राहत नाहीत. 

या गावाची आणखी एक खासियत म्हणजे या गावात कुणीही दारू पित नाही. इतकंच नाही तर गावातील सगळे लोक शाकाहारी आहेत. व्हिडिओत असाही दावा करण्यात आला आहे की, गावातील एकाही घराला लॉक लावलं जात नाही. मात्र, व्हिडिओत एका घराला लॉक लावलेलं दिसत आहे. लोक गावात फिरताना दिसत आहेत. सगळीकडे मातीची घरे आहेत. 

देवमालीमध्ये गुर्जर समाजाचे लोक राहतात. भगवान देवनारायणची ते पूजा करतात. लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, भगवान देवनारायण इथे आले होते तेव्हा गावातील लोकांच्या सेवेने खूश झाले होते. तेव्हा लोकांनी त्यांच्याकडे काहीच मागितलं नाही. त्यामुळे त्यांनी आशीर्वाद दिला की, गावात नेहमीच सुख आणि समृद्धी व शांती राहणार. पण कुणीही पक्क घर बांधू नये. तेव्हापासून कुणीही इथे घराचं पक्क बांधकाम केलं नाही.

या व्हिडिओला आतापर्यंत ५ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. लोक म्हणाले की, गाव फारच सुंदर दिसत आहे. 

Web Title: Deomali village Rajasthan everyone lives in mud house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.