VIDEO : बसमध्ये सीट मिळवण्यासाठी पती-पत्नीचा भन्नाट जुगाड, जे केलं ते पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 01:57 PM2022-02-08T13:57:17+5:302022-02-08T13:59:21+5:30

Jugaad Viral Video : बसमध्ये सीट पकडून ठेवण्यासाठी लोक खिडकीतून रूमाल किंवा एखादी वस्तू ठेवतात हे तुम्ही पाहिलं असेल, पण एका व्यक्तीने त्याही पलिकडे जाऊन कमाल केली आहे.

Desi Gugaad viral video : Wife was unable to board the bus then husband apply this jugaad | VIDEO : बसमध्ये सीट मिळवण्यासाठी पती-पत्नीचा भन्नाट जुगाड, जे केलं ते पाहून चक्रावून जाल

VIDEO : बसमध्ये सीट मिळवण्यासाठी पती-पत्नीचा भन्नाट जुगाड, जे केलं ते पाहून चक्रावून जाल

googlenewsNext

Jugaad Viral Video : आपल्या देशात टॅलेंटेड लोकांची अजिबात कमतरता नाही. काही लोकांचं टॅलेंट इतकं वेगळं आणि भन्नाट असतं की, बघून हसूच येतं. खासकरून तेव्हा जेव्हा कुणी साथ देणारं असेल. सोशल मीडियावर अनेक जुगाडांचे व्हिडीओ बघायला मिळतात.  असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. बसमध्ये सीट पकडून ठेवण्यासाठी लोक खिडकीतून रूमाल किंवा एखादी वस्तू ठेवतात हे तुम्ही पाहिलं असेल, पण एका व्यक्तीने त्याही पलिकडे जाऊन कमाल केली आहे. तसाच हा व्हिडीओ आहे जो पाहून तुम्ही पोटधरून हसाल. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक महिलेने बसमध्ये सीट न मिळाल्याने जुगाडाचा मार्ग निवडला. बसमध्ये बसलेलल्या प्रवाशाने आपल्या पत्नीला आत घेण्यासाठी जुगाड केला. आपण सर्वांनाच माहीत आहे की, कधी कधी लोक बस किंवा ट्रेनमध्ये सीट मिळवण्यासाठी भांडतात. त्यामुळे बसमध्ये चढल्यावर लोक सीटवर ताबा मिळवू लागतात. नाही तर सीट वर आपली एखादी वस्तू ठेवतात. 

तुम्ही व्हिडीओत बघू शकता की, एक व्यक्ती बसमधील मागच्या सीटच्या खिडकीजवळ आहे आणि तो बसखाली बाहेर उभ्या असलेल्या महिलेला खिडकीतून आत खेचतो. पती आपल्या पत्नीला खिडकीतून बसमध्ये खेचतो. दोघेही बसमध्ये सीट मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. मात्र, असा जुगाड करून ते सीट मिळवतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला एका लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत.
 

Web Title: Desi Gugaad viral video : Wife was unable to board the bus then husband apply this jugaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.