पाहावं ते नवलच! १५० किलोची बाईक हातांनी न धरता डोक्यावर ठेऊन चढवली गाडीच्या टपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 04:20 PM2021-09-22T16:20:40+5:302021-09-22T16:20:56+5:30
या व्हिडीओत एक माणूस चक्क डोक्यावर पल्सर घेऊन बसवर चढताना दिसतो आहे. कहर म्हणजे तो ही बाईक फक्त डोक्यावरच बॅलन्स करतोय. म्हणजे हातांनी ती बाईक न पकडता अशीच डोक्यावर ठेऊन तो ती बाईक बसवर चढवतो.
जगात टॅलेंटेड लोकांची कमी नाही. त्यात भारतातील लोक तर काय जुगाड करतील हे सांगता येत नाही. हे पाहुन अनेकदा प्रश्न पडतो, आपल्याकडे इतकं टॅलेंट असताना आपण मागे का राहतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओत एक माणूस चक्क डोक्यावर पल्सर घेऊन बसवर चढताना दिसतो आहे. कहर म्हणजे तो ही बाईक फक्त डोक्यावरच बॅलन्स करतोय. म्हणजे हातांनी ती बाईक न पकडता अशीच डोक्यावर ठेऊन तो ती बाईक बसवर चढवतो. ४५ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. IPS रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ ट्विट करत लिहलं आहे, वा काय बॅलन्स आहे!
या व्हिडीओत तुम्ही पाहून शकता, एक बस उभी आहे. बस जवळचं काही लोक पल्सर बाईकला घेऊन उभे आहे. याचवेळी तिथं असलेल्या एक व्यक्ती या बाईकला उचलून आपल्या डोक्यावर ठेवतो. आणि हळू हळू बसची शिडी चढू लागतो. विशेष गोष्ट म्हणजे, शिड्या चढताना बाईकला लावलेले दोन्ही हात हा व्यक्ती सोडून देतो आणि डोक्यावर बॅलन्स करत ही बाईक थेट बसच्या टपावर पोहचवतो.
वाह क्या BALANCE है 👌👌👌#HINDUSTANI जुगाड़ again😊😊😊😊 pic.twitter.com/cVxYKvNXnT
— Rupin Sharma IPS (@rupin1992) September 21, 2021
आता तुम्ही पल्सरचं वजन काढलं तर ते १५० किलोच्या जवळपास आहे. रस्त्यावर चालवतानाही अनेकांना बाईकला बॅलन्स करणं जमत नाही, त्यात हे महोदय थेट डोक्यावर घेऊन ही बाईक बॅलन्स करत आहेत. या महाशयांच्या ताकदीचं आणि बॅलन्सचं लोक भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.
आयपीएस रुपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ ट्विट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलंय, वाह, काय बॅलन्स आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडलेलाआहे. एका युजने कमेंट केलीय की, आपल्या देशात टॅलेंटची कुठलीही कमी नाही, फक्त त्यांना सन्मानित करणाऱ्यांची कमी आहे.