ना नांगर, ना ट्रॅक्टर चक्क बाईकने नांगरणी केली याने, व्हिडिओ पाहुन थक्क व्हाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 06:17 PM2021-09-30T18:17:38+5:302021-09-30T18:17:48+5:30
बैल आणि ट्रॅक्टरशिवायही नांगरणी करता येऊ शकते. तेसुद्धा बाईकने. एका तरुणाने चक्क आपल्या बाईकने नांगरणी करून दाखवली आहे. शेतात बाईक घेऊन नांगरणी करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देश कितीही प्रगत झाला असला तरी देशातील बहुतेक लोक आजही शेतीतून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून आहेत. शेती म्हटलं की नांगरणी आली आणि नांगरणीसाठी लागतात ते बैल किंवा ट्रॅक्टर. पण काही हे दोन्ही उपलब्ध नसेल तर काय? खरंतर काहीच फरक पडणार नाही. कारण बैल आणि ट्रॅक्टरशिवायही नांगरणी करता येऊ शकते. तेसुद्धा बाईकने.
एका तरुणाने चक्क आपल्या बाईकने नांगरणी करून दाखवली आहे. शेतात बाईक घेऊन नांगरणी करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. शेतीसाठी केलेला हा देसी जुगाड सर्वांना आवडला आहे.आता तुम्ही म्हणाल बाईकने नांगरणी कशी बरं करता येईल. तर हा व्हिडीओ पाहा.
व्हिडीओत पाहू शकता, या तरुणाने आपल्या बाईकच्या मागील दोन चाकांना एक छोटा नांगर जोडला आहे. जसं तो शेतात बाईक चालवतो तसतसं नांगरही पुढे जातं आणि अगदी कोणत्याही मेहनतीशिवाय शेत नांगरलं जातं. jugaadu_life_hacks या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.