अरे...बाईक आहे की प्लेन? देसी जुगाडाचा हा भन्नाट व्हिडिओ पाहुन तुम्हालाही पडेल हाच प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 03:49 PM2021-11-09T15:49:12+5:302021-11-09T15:51:26+5:30
एका व्यक्तीने कारपूलिंग सोल्यूशन किंवा ‘देसी जुगाड’ आणला, ज्याने नेटिझन्सला वेड लावले. मध्य प्रदेश काँग्रेसचे आमदार जयवर्धन सिंह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच भार पडतो आहे. पण असं असलं तरी भारतीयांकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. भारतभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असताना, कारपूलिंग आणि सार्वजनिक वाहतूक पैशांची बचत करत आहेत. एका व्यक्तीने कारपूलिंग सोल्यूशन किंवा ‘देसी जुगाड’ आणला, ज्याने नेटिझन्सला वेड लावले. मध्य प्रदेश काँग्रेसचे आमदार जयवर्धन सिंह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये एक पुरुष मोटरसायकल चालवत आहे, ज्यावर एक लाकडी फळी आहेत आणि त्यावर महिला आरामात बसलेल्या दिसत आहेत. तो ग्रामीण भागात दोन, तीन नव्हे तर नऊ प्रवासी रस्त्याने नेतो आहे. गाडीचा वेगही चांगला आहे. या व्यक्तीचं बाईक चालवण्याचं कौशल्यही भन्नाट आहे, कारण तो एवढ्या लोकांचं वेड्यावाकड्या रस्त्यावरही बॅलंसिंग करतो आहे. बाईकचा पुढचा भाग पाहिल्यावर त्यात पाच महिला आणि चार मुले बसल्याचे दिसते
बाईकवर असलेल्या कोणीही हेल्मेट घातलेले नसल्यामुळे आणि एकाच दुचाकीवर अनेक लोक असल्याने ते वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करत असून अपघाताला बळी पडण्याची शक्यता आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओ पाहिल्यानंतर असा जुगाड किंवा वाहन चालवण्याचा प्रयत्न करू नये असाच सल्ला देण्यात आला आहे.
सरकार ने पेट्रोल-डीज़ल को आसमान पर पहुचाया तो जनता ने भी नया जुगाड़ हवाई जहाज बना लिया.. pic.twitter.com/YvnjzdS1uP
— Jaivardhan Singh (@JVSinghINC) October 27, 2021