वाह रे पठ्ठ्या! लोकल ट्रेनमध्ये पाय ठेवायला जागा नाही, अन् याने चक्क पाय पसरून ताणून दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 02:55 PM2022-04-20T14:55:12+5:302022-04-20T14:56:05+5:30

एका Reddit युझरनं हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत शेकडो लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत.

desi jugaad man sleeping on luggage rack of mumbai local train pic goes viral on social media social viral news | वाह रे पठ्ठ्या! लोकल ट्रेनमध्ये पाय ठेवायला जागा नाही, अन् याने चक्क पाय पसरून ताणून दिली

वाह रे पठ्ठ्या! लोकल ट्रेनमध्ये पाय ठेवायला जागा नाही, अन् याने चक्क पाय पसरून ताणून दिली

googlenewsNext

मुंबईच्या लोकल ट्रेनमधील गर्दी हे सर्वांच्याच परिचयाची आहे. कार्यालयीन वेळेत तर पाय ठेवण्यासाठी जागा मिळाली तरी त्यात धन्यता मानावी लागते. महिला असतील किंवा पुरूष मंडळी कार्यालयीन वेळांमध्ये ट्रेनमधून प्रवास करणं कोणत्याही टास्कशिवाय कमी नाही. लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफ लाईनचं म्हटली जाते. कोरोनाच्या काळात काही वेळासाठी ती थांबली होती. परंतु आता ती पुन्हा जोमानं सुरू झाली आहे. ज्यांना ट्रेनच्या प्रवासादरम्यान सीट मिळते, त्यापेक्षा दुसरं काही सुख नाही असं म्हटलं जातं. तेवढ्याच वेळेत एकादी डुलकीही होऊन जाते. परंतु एका व्यक्तीनं ट्रेनच्या प्रवासादरम्यान असा काही जुगाड केला, की त्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

फोटोमध्ये एक व्यक्ती सामान ठेवण्याच्या जागेवर आरामात झोपलेला दिसतोय. त्यानं जीन्स आणि टीशर्ट परिधान केलंय. तसंच डोळ्यांवर कपडा बांधून तो आरामात त्या ठिकाणी झोपलेला दिसतोय. ज्या प्रकारे तो झोपलाय त्यावरून त्या रॅकवरही झोपणं ही एक कलाच आहे असं दिसून येतं. अनेक प्रवाशांना त्याला पाहून शॉकच बसला. तर एकानं त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Reddit वर u/Radiant_Commercial56 या नावाच्या एका व्यक्तीनं हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत शेकडो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. तसंच अन्य सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरही हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा स्वस्त स्लीपर कोच असल्याचं म्हटलं. तर काहींनी हे धोकादायक असल्याची प्रतिक्रिया दिली.

Web Title: desi jugaad man sleeping on luggage rack of mumbai local train pic goes viral on social media social viral news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.