Desi Jugaad: हवेत अचानक बंद पडले विमानाचे इंजिन, सुरू करण्यासाठी पायलटने केला 'धोकादायक' जुगाड; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 02:43 PM2022-04-04T14:43:31+5:302022-04-04T14:44:41+5:30
Desi Jugaad: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यात 'देसी जुगाड'च्या मदतीने खराब झालेल्या वस्तू चुटकीसरशी ठीक केल्या जातात.
Desi Jugaad: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यात 'देसी जुगाड'च्या मदतीने खराब झालेल्या वस्तू चुटकीसरशी ठीक केल्या जातात. यामध्येही अनेकजण आपल्या गोष्टी ठीक करण्यासाठी मोठा धोका पत्कारताना दिसतात. देसी जुगाड भारतात सर्वाधिक वापरले जातात. परदेशात याला 'लाईफ हॅक ट्रिक' म्हणतात. अशाच एका जुगाडचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही आवाक् व्हाल.
अचानक विमानाचे इंजिन बंद पडले
बिघडलेले काम करण्यासाठी अनेक वेळा लोक देसी जुगाडाचा वापर करतात. काही लोक देसी जुगाडच्या नावावर नको त्या युक्त्या वापरतात. अशाच प्रकारचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती विमानात बसलेला दिसत आहे. यादरम्यान, हवेत असताना अचानक विमानाचे इंजिन बंद पडते. यानंतर पायलटने जो देसी जुगाड केला, तो पाहून तुम्हाला धक्का बसेल.
देसी जुगाडाने इंजिन रीस्टार्ट झाले
विमानाचे इंजिन बंद पडल्यानंतर पायलट ते सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण इंजिन काही केल्या सुरू होत नाही. शेवटी तो आपल्या शरीराला एक दोरी बांधतो आणि विमानाच्या बाहेर जाऊन हाताने विमानाचा पंखा फिरवतो. हाताने पंखा फिरवताच विमान पुन्हा सुरू होते आणि त्या पायलटचा जीव भांड्यात पडतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर aircraftmaintenanceengineer नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. सुमारे 10 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे आणि नेटीझन यावर विविध कमेंट्सही करत आहेत.