देसी जुगाड! पैसे खर्च न करता तयार केलं ट्रेडमिल, Anand Mahindra ही झाले फॅन; शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 09:45 AM2023-01-10T09:45:41+5:302023-01-10T09:46:15+5:30
Desi Jugaad Video: एका व्यक्तीनं काहीही पैसे खर्च न करता किचनमध्ये ट्रेडमिलसारखा जुगाड केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Man Made Treadmill With Desi Jugaad: काही लोक खूप जुगाडू असतात, कधी कधी ते अशा गोष्टी बनवतात, ज्या पाहून सगळे थक्क होतात. अशी अप्रतिम क्षमता असलेले लोक कधी कारचे हेलिकॉप्टर करतात किंवा कधी एकही पैसा न खर्च करता एखादी गोष्ट तयार करू शकतात. असाच एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एकही पैसा खर्च न करता किचनमध्ये ट्रेडमिलसारखा व्यायाम करण्यासाठी देसी जुगाड लावताना दिसत आहे. दिग्गज उद्योजक आनंद महिंद्राही या देसी जुगाड करणाऱ्या व्यक्तीचे फॅन झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती देशी जुगाडातून ट्रेडमिल कशी बनवते आणि त्याच्या मदतीने किचनमध्येच व्यायाम सुरू करते, हे दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला, ती व्यक्ती प्रथम स्वयंपाकघरात जाते आणि नंतर काही डिशवॉशिंग लिक्विड जमिनीवर ओतते, नंतर ते निसरडे करण्यासाठी जमिनीवर पाणी ओतते. पुढे व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ती व्यक्ती ट्रेडमिलवर ज्या प्रकारे धावतात तशी धावूही लागते. यासाठी व्यक्ती किचनच्या स्लॅबचा आधार घेताना दिसत आहे.
The lowest cost treadmill in the world. And this year’s Innovation Award trophy goes to… pic.twitter.com/oMlyEPBQoy
— anand mahindra (@anandmahindra) January 7, 2023
आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अतिशय ॲक्टिव्ह असतात. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच हा जगातील सर्वात स्वस्त ट्रेडमिल असल्याचेही म्हटले जात आहे. “जगातील सर्वात कमी किंमतीचा ट्रेडमिल आणि या वर्षीचा इनोव्हेशन अवॉर्डची ट्रॉफी यालाच मिळतेय,” असे कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी दिलेय. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.