दीर आणि वहिनीने एकमेकांची केली 'धुलाई', व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 04:20 PM2021-08-12T16:20:52+5:302021-08-12T16:35:25+5:30
जेव्हाही वहिनी नवी नवरी बनून सासरी येते तेव्हाचा एक रिवाज फारच पॉप्युलर आहे. ज्यात दीर आणि वहिनी एकमेकांना काठीने मारतात.
दीर आणि वहिनीचं नातं मैत्रीपूर्ण असतं. या नात्याकडे आई-मुलगा किंवा भाऊ-बहिणीच्या नात्यासारखं पाहिलं जातं. दीर आपल्या वहिनीची प्रत्येक अडचणीत साथ देतो. जेव्हाही वहिनी नवी नवरी बनून सासरी येते तेव्हाचा एक रिवाज फारच पॉप्युलर आहे. ज्यात दीर आणि वहिनी एकमेकांना काठीने मारतात. या रिवात कधी कधी दोघेही एकमेकांना हळुवार मारतात. पण कधी कधी दोघेही जोरात एकमेकांना काठीने मारतात.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात दीर आणि वहिनी एकमेकांना काठी मारताना दिसत आहे. मंदिरात दीर आणि वहिनीला एकमेकांना मारण्यासाठी बारीक काठी दिली जाते. पण वहिनी हसत हसत दिराला जोरात काठीने मारू लागते. यावेळी दीरही हसतो. नंतर वहिनीला थांबवण्यासाठी पूर्ण परिवार समोर येतो. हा व्हिडीओ लोकांना खूपच पसंत पडला आहे. (हे पण वाचा : VIDEO : वहिनींना डान्स करताना पाहून डान्स फ्लोरवर आला दीर, हरयाणवी गाण्यावर घातला धुमाकूळ)
दीर आणि वहिनीची ही धमाकेदार जोडी लोकांना खूपच पसंत पडली. इन्स्टाग्रामवर हनी प्रजापतीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३६ हजार लाइक्स मिळाले आहेत. इतकंच नाही तर हा व्हिडीओ ७ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.