Dhinchak Pooja च्या नव्या गाण्यामुळे लोक गेले 'कोमात', यूजर्स म्हणाले - कानातून रक्त येत आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:27 PM2021-10-22T12:27:21+5:302021-10-22T12:29:56+5:30

Dhinchak Pooja : व्हिडीओत पूजा स्कूटरवर बसून गात आहे. तिच्या मागे आणखी दोन लोक स्कूटरवर दिसत आहेत. सोशल मीडियावर हे गाणं आल्या आल्या व्हायरल झालं

Dhinchak Pooja dilon ka shooter 2 point 0 released netizen's trolls her | Dhinchak Pooja च्या नव्या गाण्यामुळे लोक गेले 'कोमात', यूजर्स म्हणाले - कानातून रक्त येत आहे...

Dhinchak Pooja च्या नव्या गाण्यामुळे लोक गेले 'कोमात', यूजर्स म्हणाले - कानातून रक्त येत आहे...

Next

यूट्यूबर आणि बिग बॉसची एक्स स्पर्धक ढिंचॅक पूजा (Dhinchak Pooja) पुन्हा एकदा आपल्या गाण्याने तुमच्या कानांवर 'अत्याचार' करण्यासाठी आली आहे. ढिंचॅक पूजाचं नवं गाणं दिलों का स्कूटर २.० (Dilon ka shooter 2.0) रिलीज झालं आहे. या गाण्याचा व्हिडीओ समोर आल्यावर ढिंचॅक पूजाला सोशल मीडियावरून (Social Media) ट्रोल केलं जात आहे.

नेहमीप्रमाणे ढिंचॅक पूजाचं हे गाणंही बेसुर आहे. त्याला गाणं म्हणायचं का हाही प्रश्न आहे. पूजाने नव्या गाण्याला पॅपी सॉंग बनवण्याचा प्रयत्न केला. पार्टी म्युझिकचा वापर केला आहे. पण या गाण्यात तिचा एकही सूर बरोबर लागला नाहीये. हा व्हिडीओ एक गंमत या पलिकडे काहीच नाही. याला मनोरंजन म्हणणंही गुन्हा ठरेल. ढिंचॅक पूजा यावरून ट्रोल होत आहे. 

व्हिडीओत पूजा स्कूटरवर बसून गात आहे. तिच्या मागे आणखी दोन लोक स्कूटरवर दिसत आहेत. सोशल मीडियावर हे गाणं आल्या आल्या व्हायरल झालं. लोकांनी याची खिल्ली उडवली. यूजर्स म्हणाले की, हे  गाणं ऐकून ते घाबरले आणि त्यांच्या कानातून रक्त येऊ लागलं. अनेक फनी मीम्सही शेअर केले आहेत. 

२०१७ मध्ये ढिंचॅक पूजाचं सेल्फी मैने ले ली है हे गाणं व्हायरल झालं होतं. त्यानंतर तिचं स्वॅग वाली टोपी गाणं आलं होतं. तिची सगळीच गाणी गायनाच्या नावावर गंमत आहेत. पण तरीही तिचे गाणे-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ती ट्रोलही होते, पण तिचा तर बिझनेस होतोच आहे.
 

Web Title: Dhinchak Pooja dilon ka shooter 2 point 0 released netizen's trolls her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.