Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 08:23 PM2024-10-20T20:23:21+5:302024-10-20T20:31:03+5:30
मोबाईलमध्ये व्यस्त असताना रेल्वे ट्रॅक ओलांडणं किती धोकादायक असू शकतं याचंच उदाहरण एका व्हायरल व्हिडिओमधून समोर आलं आहे.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. मोबाईलमध्ये व्यस्त असताना रेल्वे ट्रॅक ओलांडणं किती धोकादायक असू शकतं याचंच उदाहरण एका व्हायरल व्हिडिओमधून समोर आलं आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मृत्यूपासून थोडक्यात वाचली आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स येथील आहे, जिथे रेल्वे ट्रॅक ओलांडताना एक प्रवासी आपल्या मोबाईलवर व्यस्त होता. ट्रेन येणार आहे हे त्याच्या लक्षातही आलं नाही. थोडीशीही चूक झाली असती तर ट्रेनने त्याला चिरडले असतं.
डेली मेलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पॅसेंजर ट्रॅक वेगळे करणाऱ्या बॅरिकेड्समधून जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. पण जात असताना त्याचं संपूर्ण लक्ष फोनमध्येच होतं.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ब्यूनस आयर्समध्ये सकाळी ६.२८ वाजता एक प्रवासी त्याच्या फोनवर व्यस्त होता. रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना ट्रेनच्या धडकेतून तो थोडक्यात बचावला. ट्रेनने प्रवाशाला धडक दिली, ज्यानंतर शेवटच्या क्षणी मागे येऊन त्यांने स्वतःचा जीव वाचवला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोकांनी देवानेच याला वाचवलं, हा चमत्कार आहे. हा व्यक्ती खरोखर खूप भाग्यवान होता असं म्हटलं आहे. तर काही जणांनी चालताना किंवा कोणतंही काम करताना फोन दूर ठेवा असा सल्ला दिला आहे.