घरातील झुरळ पळवून लावण्यासाठी लादी पुसताना वापरा 'ही' ट्रिक, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:01 PM2024-10-16T14:01:56+5:302024-10-16T14:03:29+5:30

Diwali cleaning tips : आता दिवाळीची साफ-सफाई करत असताना तुम्ही झुरळांना पळवून लावू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास आणि सोपी ट्रिक सांगणार आहोत.

Diwali cleaning tips : how to get rid of cockroaches from home | घरातील झुरळ पळवून लावण्यासाठी लादी पुसताना वापरा 'ही' ट्रिक, मग बघा कमाल!

घरातील झुरळ पळवून लावण्यासाठी लादी पुसताना वापरा 'ही' ट्रिक, मग बघा कमाल!

Diwali cleaning tips :  जास्तीत जास्त लोकांच्या घरात झुरळ ही एक मोठी समस्या बघायला मिळते. घरात सगळीकडे फिरणारे हे झुरळ बॅक्टेरिया वाढवतात. झुरळ सगळ्यात जास्त किचनमध्ये हैदोस घालतात. ज्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं. अशात आता दिवाळीची साफ-सफाई करत असताना तुम्ही झुरळांना पळवून लावू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास आणि सोपी ट्रिक सांगणार आहोत. लादी पुसताना बकेटीतील पाण्यात ५ गोष्टी मिक्स केल्यावर झुरळ घरातून गायब होतील. 

झुरळ पळवण्याचे घरगुती उपाय

लवंग पेस्ट

- दिवाळीची सफाई करताना एक बकेट पाण्यात लवंग पेस्ट मिक्स करून घरातील लादी स्वच्छ करा. जर तुमच्याकडे लवंग तेल असेल तेही वापरू शकता. लवंगचा वास झुरळांना आवडत नाही. त्यामुळे ते घरातून पळून जातात.

- लादी पुसण्याच्या पाण्यात तुम्ही कारल्याची पेस्टही टाकू शकता. याचाही वास झुरळांना अजिबात आवडत नाही. त्याशिवाय एक बकेट पाण्यात १ चमचा व्हिनेगर आणि २ चमचे बेकिंग सोडाही मिक्स करू शकता. 

- तसेच घरातील जाळ्या दूर करण्यासाठी तुम्ही एक वाटा पाण्यात ब्लीच पावडर मिक्स करा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून घरातील कोपऱ्यांमध्ये स्प्रे करा. याने कोळी घरातून पळून जातील आणि पुन्हा जाळ्या होणार नाहीत.

Web Title: Diwali cleaning tips : how to get rid of cockroaches from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.