दिल्लीत बिकिनीमध्ये तरुणीने केला मेट्रोमधून प्रवास, फोटो व्हायरल झाल्यानंतर डीएमआरसीने 'हे' सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 07:53 PM2023-04-03T19:53:02+5:302023-04-03T19:53:59+5:30

दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी परिधान करुन प्रवास करणाऱ्या तरुणीच्या मुद्द्यावर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे वक्तव्य आले आहे.

dmrc statement on girl traveling in bikini in delhi metro | दिल्लीत बिकिनीमध्ये तरुणीने केला मेट्रोमधून प्रवास, फोटो व्हायरल झाल्यानंतर डीएमआरसीने 'हे' सांगितले

दिल्लीत बिकिनीमध्ये तरुणीने केला मेट्रोमधून प्रवास, फोटो व्हायरल झाल्यानंतर डीएमआरसीने 'हे' सांगितले

googlenewsNext

दिल्लीमेट्रोमध्ये बिकिनी परिधान करुन प्रवास करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाल आहे. यावर काहींनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी समर्थन केले. या सगळ्यामध्ये दिल्लीमेट्रो रेल कॉर्पोरेशनचे वक्तव्य आले समोर आले आहे.

यामध्ये डीएमआरसीने म्हटले आहे की, आमच्या प्रवाशांनी समाजात स्वीकारल्या जाणार्‍या सामाजिक शिष्टाचार आणि प्रोटोकॉलचे पालन करावे अशी आमची अपेक्षा आहे. प्रवाशांनी असा कोणताही पोशाख परिधान करु नये किंवा सहप्रवाशांच्या भावना दुखावणारी कोणतीही कृती करू नये.

जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले पंतप्रधान मोदी, अमेरिकेच्या बायडन यांनाही खूप मागे टाकलं!

डीएमआरसी ऑपरेशन आणि मेंटेनन्स कायद्याच्या कलम-५९ अंतर्गत असभ्यता हा दंडनीय गुन्हा मानला  आहे. आम्ही सर्व प्रवाशांना आवाहन करतो की, मेट्रोमध्ये प्रवास करताना शिष्टाचार जपावे. 'प्रवास करताना कपड्यांची निवड ही वैयक्तिक बाब आहे, पण प्रवाशांनी जबाबदार नागरिकाप्रमाणे वागणे अपेक्षित आहे, असंही डीएमआरसीने म्हटले आहे. 

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर DMRC ने मोठा निर्णय घेतला आहे. मेट्रोचा वापर करणाऱ्या अभ्यागतांच्या सोयीसाठी DMRC ने दिल्ली मेट्रोच्या सर्व मार्गावरील शेवटच्या ट्रेनची वेळ वाढवण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, अरुण जेटली स्टेडियम हे व्हायलेट लाईनवरील दिल्ली गेट मेट्रो स्टेशनजवळ आहे. ट्रॅफिक पाहता मॅच पाहण्यासाठी जाणाऱ्यांसाठी मेट्रो ही पहिली प्राथमिकता ठरत आहे.

Web Title: dmrc statement on girl traveling in bikini in delhi metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.