तुम्हीसुद्धा 'विकेंड'ची सतत वाट बघता का ? यावर सद्गुरुंनी दिलेले उत्तर ऐकाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:01 PM2022-11-17T15:01:42+5:302022-11-17T15:04:57+5:30
सोमवार आला की अनेकांचे चेहरेच पडतात. आणि शुक्रवार आला की हेच चेहरे खुलतात. नोकरी करणारे लोक कधी विकेंड सुरु होतो याचीच वाट बघत असतात. असे का होते याचा विचार केलाय का ?
सोमवार आला की अनेकांचे चेहरेच पडतात. आणि शुक्रवार आला की हेच चेहरे खुलतात. नोकरी करणारे लोक कधी विकेंड सुरु होतो याचीच वाट बघत असतात. असे का होते याचा विचार केलाय का ? व्यवसायापेक्षा नोकरी करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. हे लोक काम करुन इतके थकतात की थोडी शांतता हवी म्हणून एकटेच कुठेतरी निघुन जातात. तुम्ही जे काम करत आहेत त्यात तुम्ही खुश नाही, समाधानी नाही असाच त्याचा अर्थ होतो. म्हणुनच तुम्ही विकेंड कडे आस लावून बसलेले असता. हे केवळ भारतातच नाही तर जगात घडते. तुमचे वर्क लाईफ बॅलन्स कसे असावे यासाठी सद्गुरु यांनी उत्तम उदाहरण दिले आहे.
सद्गुरु यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'काही वर्षांपुर्वी त्यांच्या एका मित्राने त्यांना अमिरिकेतील एका हॉटेलमध्ये नेले. त्या रेस्टॉरंटचे नाव होते TGIF'टीजीआयएफ'. मी विचारले हे टीजीआयएफ काय आहे. त्यावर मित्र म्हणाला, याचा अर्थ आहे थैंक गॉड इट्स फ्रायडे. म्हणजे शुक्रवारी दुपारच्या वेळी अनेक लोक काम करणे हळूहळू बंद करतात. कारण नंतर विकेंड येणार असतो म्हणून ते खुश असतात. '
यावर सद्गुरु सांगतात, 'याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती हा केवळ वीकेंडसाठीच जगत आहे. तुम्ही जे करत आहात त्यात तुम्हाला मजा येत नाही तर कृपया असे करु नका.जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत आपण आयुष्यच जगत असतो. त्यामुळे त्यात काम हे मृत्युसारखे असु नये. '
सद्गुरुंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. ७०० हून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. तर अनेकांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.