आपण यांना ओळखलंत का? हेच ते बागपत चाचा ज्यांनी ८ जणांना बदडून काढले, पाहा यांचा लेटेस्ट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 02:48 PM2021-07-12T14:48:26+5:302021-07-12T14:56:00+5:30
तुम्हाला बागपत चाचा आठवतात का? उत्तर प्रदेशमधील बागपत गावातील हे चाचा इंटरनेटवर व्हायरल झालेले. एका मारामारीत त्यांनी ८ जणांना एकट्याने चांगलीच अद्दल घडवली होती.
काही व्हायरल व्यक्ती अशा असतात की लोकांच्या आठवणीत घर करून असतात. लोक नंतरही त्यांना लक्षात ठेवातत. अशाच एका व्हायरल झालेल्या व्यक्तीचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. तुम्हाला बागपत चाचा आठवतात का? उत्तर प्रदेशमधील बागपत गावातील हे चाचा इंटरनेटवर व्हायरल झालेले. एका मारामारीत त्यांनी ८ जणांना एकट्याने चांगलीच अद्दल घडवली होती. त्यानंतर ते ८ जण जेलमध्येही गेले होते. शेफाली तोमार यांनी ट्वीटरवर त्यांचा पुन्हा एक फोटो शेअर केला आहे. यात तिने प्रश्न विचारलाय. तुम्ही यांना ओळखता का? हिंट आहे चाट म्हणजेच भेलपुरी, पाणीपुरी.
तुम्हाला आठवत असेल की उत्तरप्रदेशच्या बागपत मध्ये दोन गटात हाणामारी झाली होती. दोन चाटचे ठेले एकमेकांच्या बाजूबाजूला होते. त्यापैकी एका चाटवाल्या दुकानदाराने बाजूच्या दुकानात गेलेल्या ग्राहकाला आपल्याकडे खेचले. यावरून दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओही व्हायरल झाला. जो तुम्ही खाली पाहु शकता.
#WATCH Baghpat: Clash breaks out between two groups of 'chaat' shopkeepers over the issue of attracting customers to their respective shops, in Baraut. Police say, "Eight people arrested, action is being taken. There is no law & order situation there."
— ANI UP (@ANINewsUP) February 22, 2021
(Note: Abusive language) pic.twitter.com/AYD6tEm0Ri
या व्हिडोओत प्रत्येकजण एकमेकाला जोरदार मारतोय पण यात सर्वात लक्षात राहतात ते बागपत चाचा. त्यांनी एकट्याने ८ जणांना असा काही धडा शिकवला की नेटीझन्स अवाक् झाले. चाचा जमिनीवर लोळूनलोळून त्यांना बडवत होते. त्यावेळी ट्विटरवर #chacha नावाने हा व्हिडिओ ट्रेण्ड मध्ये होता.
अशा या बागपत चाचांचा नवा फोटो व्हायरल झाला आहे. यात मात्र ते थोडे वेगळे दिसत आहेत. त्यावेळी हा व्हिडिओ पाहताना लोक पोट फुटेपर्यंत हसत होते. पाहा बागपत चाचा आता कसे दिसतात.
क्या आप इनको पहचानते हैं ? हिंट है चाट 😊 pic.twitter.com/9OBehWHGRQ
— Shefali Tomar 🇮🇳 (@shefali_tomar) July 11, 2021