Pregnant woman : सलाम! वेदनेनं तडफडत होती गर्भवती; प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 12:44 PM2021-04-27T12:44:13+5:302021-04-27T12:48:27+5:30

Doctor lifted pregnant woman : रुग्णालयाच्या बाहेर स्ट्रेचर न मिळाल्यानं वेदनेनं तडफडत असलेल्या महिलेला उचलून घेत त्यांनी आपात्कालीन (Emergency) वार्डात पोहोचवलं.

Doctor lifted pregnant woman and brought into emergency ward during shortage of stretcher | Pregnant woman : सलाम! वेदनेनं तडफडत होती गर्भवती; प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल

Pregnant woman : सलाम! वेदनेनं तडफडत होती गर्भवती; प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल

Next

कोरोना माहामारीच्या गंभीर स्थितीत वैद्यकीय सेवेतील कर्मचारी रात्रंदिवस घाम गाळून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांचा  जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वेदनेनं तडफडत असलेल्या एका महिलेला वाचवण्यासाठी डॉक्टरनं या महिलेला उचलून घेतलं आहे. हरियाणातील जींद जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) डेप्युटी सिव्हिल सर्जन डॉ. रमेश पांचाल यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. 

स्ट्रेचर न मिळाल्यानं वेदनेनं तडफडत असलेल्या महिलेला उचलून घेत त्यांनी आपात्कालीन (Emergency) वार्डात पोहोचवलं. डॉक्टरांनी महिलेला उचलेलं पाहताच कर्मचारी लगेचच स्ट्रेचर घेऊन आले, मात्र तोपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला होता. ३८ वर्षीय  सोनिया ८ महिन्यांची गर्भवती होती. तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सोनिया या उत्तर प्रदेशच्या बांदा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. सोनिया आपला पती रामशाहीसह खरकरामजी गावातील एका विट भट्टीमध्ये काम करत होती.

 आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला असून आतापर्यंत ६१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे तर ११ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.  जींदच्या रुग्णालयात स्ट्रेचर मिळाली नाही आणि महिलेची स्थिती गंभीर दिसली.यानंतर महिला रुग्णाला आपल्या दोन्ही हातांनी उचलत डेप्यूटी सिव्हिल सर्जन डॉक्टर रमेश पांचाल धावले, salute sir...कोण म्हणतं की माणुसकी संपली आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

सिव्हिल हॉस्पिटलचे एसएमओ डॉ. गोपाल गोयल यांनी सांगितले की, ''ही महिला रुग्णालयात दाखल झाली तेव्हा खूप अशक्त अवस्थेत होती. तिला उपचार पूर्ण होण्याआधी तिला परत घरी घेऊन गेले होते. सोमवारी अचनाक तब्येत बिघडल्यामुळे या महिलेला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी 110 हून अधिक कोरोना रुग्ण दाखल असल्यानं स्ट्रेचर शिल्लक नसल्याचं सांगण्यात आलं.''

Web Title: Doctor lifted pregnant woman and brought into emergency ward during shortage of stretcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.