Doctor pic : सलाम! समोर आला पीपीई कीट काढल्यानंतरचा डॉक्टरचा फोटो; फोटो पाहून तुम्हीही व्हाल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 01:46 PM2021-04-29T13:46:50+5:302021-04-29T13:57:50+5:30

Doctor tweets pic after removing his ppe kit : या फोटोमध्ये पीपीई कीट काढल्यानंतर या डॉक्टरला किती घाम आला आहे, हे तुम्ही पाहू शकता.

Doctor tweets pic after removing his ppe kit and says proud to serve the nation photo goes viral | Doctor pic : सलाम! समोर आला पीपीई कीट काढल्यानंतरचा डॉक्टरचा फोटो; फोटो पाहून तुम्हीही व्हाल भावुक

Doctor pic : सलाम! समोर आला पीपीई कीट काढल्यानंतरचा डॉक्टरचा फोटो; फोटो पाहून तुम्हीही व्हाल भावुक

Next

संपूर्ण देश कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे आतापर्यत २  लाखांपेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, नर्स  यांसह इतर वैद्यकिय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. सोशल मीडियावर सध्या  अशाच एका डॉक्टरचा फोटो व्हायरल होतोय या फोटोमध्ये पीपीई कीट काढल्यानंतर या डॉक्टरांना किती घाम आला आहे, हे तुम्ही पाहू शकता.

हा फोटो डॉक्टर सोहिल यांनी २८ एप्रिलला आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, मी देशासाठी काम करतो याचा मला गर्व आहे. हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूच्या फोटोत डॉक्टरांनी पीपीई कीट घातला आहे तर उजव्या बाजूच्या फोटोत पीपीई किट काढल्यामुळे या डॉक्टरांचे संपूर्ण शरीर  घामाने भिजले आहे.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

त्यांनी हा फोटो ट्विट करताना कॅप्शन दिलं की, 'मी सगळे डॉक्टरर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्याकडून सांगू इच्छितो की, आम्ही आमच्या कुटुंबियांपासून खूप लांब आहोत. कधी कधी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या १ पाऊल जवळ राहून उपचार करावे लागतात. अशा स्थितीत सगळ्यांनी लस घ्यायलाच हवी असं  मी आवाहन करतो. आता फक्त हेच समाधान आहे, सुरक्षित राहा.'

 बाहेरून कोणीही आल्यास तुमच्या घरातही होऊ शकतो कोरोनाचा शिरकाव; CDC नं दिल्या गाईडलाईन्स

आतापर्यंत ५७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी डॉक्टर सोहिल यांच्या फोटोला लाईक केलं आहे. तर १ हजारापेक्षा जास्त लोकांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडिया युजर्सनी पीपीई किट घालून फोटो शेअर केलेल्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Web Title: Doctor tweets pic after removing his ppe kit and says proud to serve the nation photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.