बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 07:11 PM2024-12-02T19:11:42+5:302024-12-02T19:12:31+5:30
Dog disturbs marriage rituals, viral video: लग्नाच्या विधीदरम्यान कुत्र्याच्या एंट्री घेतली अन् सारंच वातावरण बदलून टाकलं
Dog disturbs marriage rituals, viral video: आजकाल लग्नाशी संबंधित मजेदार आणि अनोखे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होताना दिसतात. हे व्हिडीओ नेटिझन्सचे चांगलेच मनोरंजन करतात. काही व्हिडीओमध्ये तर अनपेक्षित घटनाही घडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी लग्नाच्या मंडपात एक नवरा मुलगा लुडो खेळताना दिसला होता. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये नवरदेव लग्नाच्या मंडपात बसून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होता. आतादेखील लग्नमंडपातील एक भन्नाट सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. त्यात लग्नमंडपात थेट कुत्रा शिरल्याने नवरा-नवरीची पळापळ झाल्याचे दिसत आहे. लग्नाच्या विधीदरम्यान एका कुत्र्याच्या एंट्रीने वातावरण कसे पूर्णपणे बदलून टाकले हे या व्हिडिओमध्ये दिसते आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की वधू मंडपात विधी करत असताना एक कुत्रा तिथे येतो. त्यानंतर तो कुत्रा वधूचा पाठलाग करतो. ती देखील त्याला हुसकावून लावायचा प्रयत्न करते. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की वधू कुत्र्याला पाहताच इकडे-तिकडे पळू लागते. हे दृश्य इतके अनपेक्षित आणि हसू येणारे असते की तिथे उपस्थित लोकांना हसू अनावर होते. हा प्रकार पाहताना नवरदेव अवाक् होतो. तो देखील कुत्र्याला हुसकवण्याचा प्रयत्न करतो, पण तो कुत्रा लग्नमंडपातील सर्व साहित्य उडवून टाकतो अन् मग तेथून पळून जातो.
पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ-
दरम्यान, @bridallehengadesignn नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. या क्लिपवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, रीलच्या निमित्ताने काही लोकांनी लग्नाला जोक बनवून टाकला आहे. तर काहींचे म्हणणे आहे की, ही नवरी मुलगी खूपच ओव्हर अँक्टिंग करत आहे. काहींना हा कुत्रा पाहून हम आपके है कौन या चित्रपटातील टफीची आठवणही झाल्याचे सांगितले आहे.