चक्क मायकल जॅक्सनला कॉपी केलं या श्वानाने, असा ऐटीत करतोय मुन वॉक की नेटकरीही चकित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 05:52 PM2022-08-22T17:52:11+5:302022-08-22T17:54:28+5:30

एका कुत्र्याने (Dog Viral Video) ते करून दाखवलंय! मायकेल जॅक्सनला कॉपी केलंय काय बेस्ट कॉपी केलंय एकच नंबर…तुम्हीच बघा!

dog copies Michel Jackson do moon walk video goes viral on social media | चक्क मायकल जॅक्सनला कॉपी केलं या श्वानाने, असा ऐटीत करतोय मुन वॉक की नेटकरीही चकित

चक्क मायकल जॅक्सनला कॉपी केलं या श्वानाने, असा ऐटीत करतोय मुन वॉक की नेटकरीही चकित

Next

मायकेल जॅक्सन (Michael Jackson) ला कोण ओळखत नाही? प्रसिद्ध पॉप गायक आणि डान्सर होता, जो आपल्या गाण्यांनी जगाला मंत्रमुग्ध करत असे, तसेच आपल्या डान्सने नाचवत असे. मात्र, त्याचा डान्स कुणीही कॉपी करेल इतका सोपा नव्हता. त्यांची प्रत्येक स्टेप अशी होती की डान्सर्सना घाम फुटायचा आणि आजही असेच काहीसे आहे. आजही त्याच्या डान्स स्टेप्स प्रसिद्ध आहेत ज्या स्टेप्समध्ये डान्स स्टेप्समध्ये मून वॉक (Moon Walk Dance Steps), क्रॉच ग्रॅब, स्पिन आणि फूट शफल इत्यादींचा समावेश आहे. मायकेल जॅक्सन या स्टेप्स अगदी आरामात करायचा पण बाकीच्या डान्सर्सना ते करताना खूप अडचणी येतात. पण एका कुत्र्याने (Dog Viral Video) ते करून दाखवलंय! मायकेल जॅक्सनला कॉपी केलंय काय बेस्ट कॉपी केलंय एकच नंबर…तुम्हीच बघा!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टीव्हीवर मायकल जॅक्सनचा डान्स सुरू असून एक कुत्रा त्याच्या डान्सची कॉपी करताना दिसत आहे. मायकेल जॅक्सन जेव्हा फिरतो तेव्हा कुत्राही त्याच्याकडे पाहून गोल फिरतो. मून वॉक बघत असताना कुत्राही त्या स्टाइलची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. कुत्र्याच्या अनोख्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कुत्र्यांशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण कुत्रा असा नाचताना तुम्ही क्वचितच पाहिला असेल. हा मायकल जॅक्सन डान्स पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्याचा धक्काही बसेल.

 

 

Web Title: dog copies Michel Jackson do moon walk video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.