Video: भारीच! पोलिसाला आला हृदयविकाराचा झटका, श्वानाने दिला सीपीआर; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:21 AM2023-07-21T11:21:43+5:302023-07-21T11:23:09+5:30
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कुत्र्याचे प्रशिक्षण पाहून नेटकरी चक्रावले आहेत.
आपल्या कुत्रा हा निष्ठावान प्राणी समजला जातो. आपण कुत्र्याने मालकाचा जीव वाचवला अशा अनेक घटना ऐकल्या आहेत, अनेकजण कुत्रा पाळतात. सध्या अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्याकडे पोलीस तपासासाठीही कुत्र्याचा वापर केला जातो, तपास विभागाचे पथकही कुत्र्यांना प्रशिक्षण देतात. अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये तो एका पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराच्या झटक्यानंतर सीपीआर देताना दिसत आहे.
कॉकरेजमुळे बसला मोठा झटका! महिलेला लाखोंची नोकरी अन् राहत घर सोडावं लागलं
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत, एक व्यक्ती उभा असताना जमिनीवर पडतो, काही वेळातच त्याच्याजवळ एक कुत्रा धावत पोहोचतो आणि त्या व्यक्तीच्या छातीवर उड्या मारायला लागतो. काही वेळाने, तो त्या व्यक्तीला मिठी मारतो आणि नंतर छातीवर उडी मारतो. तो कुत्रा त्या व्यक्तीला पीसीआर देत आहे.
हा व्हिडीओ स्पेनमधील असल्याचे सांगण्यात येत असून व्हिडिओमध्ये एका कुत्र्याला सीपीआर देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. परीक्षेची वेळ आली तेव्हा कुत्र्याने प्रशिक्षणानुसार त्या व्यक्तीला सीपीआर दिला. या व्हिडीओत त्या व्यक्तीला ना हृदयविकाराचा झटका आला होता ना तो जमिनीवर पडला होता, परंतु तो कुत्रा प्रशिक्षण चाचणी देण्यासाठी जमिनीवर पडला होता.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कुत्र्याचे प्रशिक्षण पाहून नेटकरी चक्रावले आहेत. अनेक दिवसांपासून अशा घटना समोर येत आहेत यात हृदयविकाराच्या झटक्याने काही वेळातच लोक आपला जीव गमावत आहेत. सीपीआर दिल्यास लोकांचे प्राण वाचू शकतात, असे सांगितले जाते. यासंबंधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ स्पेनचा आहे. या कुत्र्याला माद्रिद पोलिसांनी प्रशिक्षण दिले आणि टेस्टवेळीही या कुत्र्याने व्यवस्थित सीपीआर देऊन लोकांना टाळ्या द्यायला भाग पाडले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
Police Dog Performs CPR On Trainer pic.twitter.com/qeIYI1jyI4
— B&S (@_B___S) July 18, 2023