हेच राहिलं होतं! मंदिरात बघायला मिळालं अनोखं दृश्य, भक्तांना 'आशीर्वाद' देताना दिसला कुत्रा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 02:34 PM2021-01-11T14:34:06+5:302021-01-11T14:47:40+5:30
हे व्हिडीओ फेसबुक यूजर Arun Limadia ने रविवारी शेअर केलेत. पोस्टनुसार, हा नजारा महाराष्ट्रातील सिद्धटेक येथील सिद्धीविनायक मंदिरातील आहे.
सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ सिद्धटेक सिद्धीविनायक मंदिरातील आहे. या मंदिराच्या दारावर बसलेला एक कुत्रा येता-जाता भक्तांना हात मिळवतो आणि त्यांना 'आशीर्वाद' देतो. एका व्यक्ती हे अनोखं दृश्य कॅमेरात कैद करून व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंटही करत आहेत.
हे व्हिडीओ फेसबुक यूजर Arun Limadia ने रविवारी शेअर केलेत. पोस्टनुसार, हा नजारा महाराष्ट्रातील सिद्धटेक येथील सिद्धीविनायक मंदिरातील आहे. या मंदिरात भगवान गणेशाची पूजा केली जाते.
हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओला १४ हजारांपेक्षा शेअर आणि ८.४ हजारांपेक्षा अधिक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओला १.९ हजार शेअर आणि १.१ हजार प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मंदिराच्या दारावर एक मोकाट कुत्रा बसला आहे. जेव्हा मंदिरातून बाहेर येणारी व्यक्ती त्याच्यासमोर नमस्कार करण्यासाठी वाकते तेव्हा तो त्याला डोक्यावर पाय ठेवून आशीर्वाद देतो. तर दुसऱ्या व्हिडीओत कुत्रा इतर भक्तांसोबत हात मिळवताना दिसत आहे.
ऑनलाइन पब्लिक या कुत्र्याचे फॅन झाले आहेत. काही लोकांनी लिहिले की, ते या मंदिराला भेट देतील जेणेकरून ते या कुत्र्याला भेटू शकतील. तर काही लोक म्हणाले की, कुत्र्याला भूक लागली असेल म्हणून तो लोकांकडे काही खायला मागत असेल. काही असो कुत्र्याने मात्र लोकांची मने जिंकली आहेत.