VIDEO : आजारी होते मालक, त्यांना भेटण्यासाठी रोज घरातून पळून हॉस्पिटलला जात होता हा डॉगी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 02:56 PM2021-01-22T14:56:58+5:302021-01-22T15:19:30+5:30
मालकाची तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या व्यक्तीचा कुत्रा रोज घरून पळून जाऊन मालकाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात होता.
कुत्रे किती इमानदार असतात याची उदाहरणे आपण नेहमीच बघत असतो. असंच एक उदाहरण समोर आलं आहे. ही घटना आहे उत्तर तुर्कीतील. मालकाची तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या व्यक्तीची कुत्री रोज घरून पळून जाऊन मालकाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात होता.
१४ जानेवारीची ही घटना आहे. Boncuk नावाच्या कुत्र्याने अॅम्बुलन्सला फॉलो केलं ज्यात तिचा मालक Cemal Sentruk ला हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. ही कुत्री रोज ब्लॅक सी Trabzon टाउनमध्ये आपल्या मालकाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात होती.
This is the best you will watch today!
— Sudha Ramen IFS 🇮🇳 (@SudhaRamenIFS) January 22, 2021
This cute dog visits the hospital everyday where the master is admitted, waiting to get his glimpse. Watch the emotional outpour when they finally meet.pic.twitter.com/8OhGayXsxF
Aynur Egeli जी Cemal यांची मुलगी आहे. तिने सांगितले की, ती डॉगीला हॉस्पिटलमधून घरी घेऊन जात होती. पण पुन्हा ती पळून जाऊन हॉस्पिटलमध्ये मालकाजवळ जात होती. हॉस्पिटलचा सिक्युरिटी गार्ड Muhammet Akdeniz ने सांगितले की, ही डॉगी रोज सकाळी ९ वाजता येत होती आणि रात्र झाली की परत घरी जात होती. पण ही डॉगी कधीही हॉस्पिटलच्या आत गेली नाही.
Cemal यांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनाही तिला भेटल्याशिवाय राहवलं नाही. ते स्वत: त्यांच्या व्हीलचेअरवर बसून डॉगीला भेटण्यासाठी बाहेर आले. नुकतीच त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली. आता ते दोघेही घरीच आहे. या डॉगीने सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकली आहेत.