नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 02:12 PM2024-06-17T14:12:44+5:302024-06-17T14:18:48+5:30

अल्पावधीतच आपल्या हटके स्टाईलने नागपूरच्या डॉली चहावाल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

dolly chaiwala went to maldives from nagpur make tea aside by sea video goes viral on social media | नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद

नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद

नागपुरातील एक चहा विक्रेता सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. तो इतका प्रसिद्ध आहे की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेले बिल गेट्सही भारतात येऊन त्याच्याकडे चहा प्यायले आहेत. अल्पावधीतच आपल्या हटके स्टाईलने नागपूरच्या डॉली चहावाल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

नागपुरातील टपरीवर चहा बनवण्याच्या आपल्या अनोख्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेला डॉली चहावाला आता जगभर फिरत आहे. तेथे तो लोकांना चहा बनवून देत आहे. सध्या डॉली चहावाला मालदीवमध्ये पोहोचला आहे. मालदीवमधील समुद्र किनाऱ्यावर डॉलीने आपली टपरी टाकली आणि पर्यटकांना चहा दिला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून खूप लोक तो खूप शेअर करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डॉली चहावाला मालदीवमध्ये समुद्र किनाऱ्यावर टपरी टाकून चहा बनवत आहे. त्याच्या आजुबाजुचे लोक त्यांच्या चहा बनवण्याच्या हटके स्टाईकडे आश्चर्यचकित नजरेने पाहत आहेत. त्यानंतर काही पर्यटक येतात आणि ते त्याने बनवलेल्या चहाचा आस्वाद घेतात, त्याच्यासोबत फोटो देखील काढतात. 

डॉली चहावाल्याने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट @dolly_ki_tapri_nagpur वरून हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2.6 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्याच्या या स्टाईलचं कौतुक केलं आहे. 
 

Web Title: dolly chaiwala went to maldives from nagpur make tea aside by sea video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.