भाजी विक्रेत्या निरा मावशींनी घडविला 'हिरा'; योगेश ठोंबरे कष्टाच्या जोरावर झाला सीए
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:45 PM2024-07-16T16:45:00+5:302024-07-16T16:49:02+5:30
सध्या सोशल मीडियावर डोंबिलीतील एका तरुणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
Social Viral : ती एक साधी भाजी विक्रेती महिला. भाजी विकून आपल्या मुलांचा सांभाळ करीत उदरनिर्वाह करते, भाजी विकून मिळालेल्या पैशातून पोटाला चिमटा काढत तिने मुलाला उच्च शिक्षण दिले. तिच्या कष्टाला, घामाला यशाचे फळ आले. तिचा मुलगा योगेश सीए झाला. त्याने आनंदाच्या भरात आईला मिठी मारली. याप्रसंगी दोघांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. योगेश ठोंबरेचास संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणा देणारा ठरेल. सोशल मीडियालवर नेटकऱ्यांनी योगेश ठोंबरेचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
अमाप कष्ट करत आपल्या मुलाचे संगोपन करणाऱ्या या माऊलीचे नाव निरा ठोंबरे असे आहे. निरा या कल्याणनजीकच्या खोणी गावात राहतात, पतीचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, त्यांनी कठीण परिस्थितीमध्येही हार मानली नाही. खोणी गावातून त्या सकाळीच बाजारात जातात.
भाजीपाला घेऊन त्या डोंबिवली पूर्वेतील गांधीनगरमध्ये जाऊन त्याची विक्री करतात. एक दिवसही निरा यांनी त्यांच्या भाजी विक्रीच्या कामात खंड पडू दिला नाही. त्यांना एक मुलगी आणि दोन मुलगे आहेत. त्यापैकी एका मुलाचे आणि मुलीचे लग्न झाले आहे. त्यांच्या नातवंडांनाही त्या शिक्षण देत आहेत.
आईच्या कष्टाचं चीज-
लहान मुलगा योगेश हा शाळेत असल्यापासून हुशार. त्याने मराठी माध्यमातून शिक्षण घेत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानतर त्याने सीएची परीक्षा दिली.त्यात तो यशस्वी झाला. हे करत असताना त्याच्या भाजी विकणाऱ्या आईने त्याला सतत प्रेरणा दिली की, माझी काळजी करू नकोस. परीक्षेत यशस्वी हो. योगेशनेही आईच्या कष्टाचे चीज केले आहे. सीए झालेल्या योगेशने आईला साडी भेट दिली. तिला घट्ट मिठी मारली. तेव्हा दोघांच्या आनंदापुढे आकाशही ठेंगणे आले होते. सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्हिडीओ द्वीट केला आहे. या व्हिडीओवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
सीए होताच साडीभेट-
याबाबत योगेश याने सागितले की, मी मराठी माध्यमातील विद्यार्थी होतो. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून शिकत असताना आपण ओव्हरकम करू की नाही, असं वाटत होतं . दहावीनंतर प्रगती कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १२ नंतर काय करायचं ? असा प्रश्न होता. मित्रांती सांगितले की, सीए कर, तेव्हा त्याकडे वळलो. सीए होण्यासाठी मीच अभ्यास केला नाही, तर माझ्यासोबत माझ्या घरच्यांनीही अभ्यास केला. मी जागा असायचो. तर घरात आर्डदेखील जागी असायची. आईला काही भेटवस्तू कधी दिली नव्हती. त्यामुळे सीए होताच तिला साडी भेट दिली. या यशात माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोचर शिक्षक आणि मित्रांची साथ मिळाली