माझ्या मृत्यूनंतर २० मिनिटांहून जास्त रडू नका, थोडीशी घेऊनच या; महिलेची अखेरची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:25 PM2022-04-20T16:25:40+5:302022-04-20T16:26:03+5:30
या महिलेचा व्हिडिओ ४३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्वप्न आणि अपेक्षा असतात. आयुष्य जगण्यासाठी त्या असायलाच हव्यात. परंतु जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात अखेरची इच्छा ही भावूक गोष्ट आहे. लंडनच्या एका महिलेच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या महिलेने तिची अखेरची इच्छा काय आहे हे बोलून दाखवलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत तिने म्हटलंय की, तिच्या मृत्यूनंतर कोणीही २० मिनिटांपेक्षा जास्त रडू नये आणि थोडे प्यायल्यानंतर या. मेकअपच्या वस्तू शवपेटीमध्ये ठेवाव्यात. लंडनच्या या महिलेची शेवटची इच्छा ही महान कवी हरिवंशराय बच्चन यांच्या अमर कृती मधुशालामध्ये निर्मित झालेल्या शेवटच्या इच्छेसारखीच आहे. या महिलेचा व्हिडिओ ४३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्याने त्यावर प्रतिक्रिया उमटणे साहजिकच आहे. स्त्रीची शेवटची इच्छा कितपत पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे, कारण ती अंमलात आणण्यासाठी कोणतीही कायदेशीर किंवा सामाजिक सक्ती नाही. तिचे कुटुंबीय त्याला कितपत स्वीकारतील किंवा त्याची पूर्तता करतील, हेही आता सांगणे कठीण आहे. कदाचित ही इच्छा धुळीलाही मिळेल. मात्र, या महिलेला तिच्या मृत्यू आणि अंत्यसंस्कारावर काय हवे आहे हे तिनं सांगितले आहे. अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी तिने कोणते नियम जाहीर केले आहेत जाणून घ्या.
‘ही’ आहे महिलेची शेवटची इच्छा
तुम्ही अंत्यसंस्काराला उपस्थित आहात याची ओळख पटवण्यासाठी नवीन किंवा जुना फोटो आयडी आणा.
मेकअपच्या वस्तू म्हणजे फाउंडेशन, लिपस्टिक, सूरमा इत्यादी शवपेटीमध्ये ठेवाव्यात.
सर्वांनी च्युइंगम खा, जरी मी त्यावेळेला नसले तरी माझ्या अखेरच्या इच्छेचा आदर करा.
अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी रंगीबेरंगी कपडे परिधान करून या.
अंत्ययात्रेवेळी अन्न हाताने बनवावे.
अखेरच्या प्रवासाला उपस्थित राहणाऱ्यांनी दोन पॅग दारू घेऊन यावे लागेल. जे कमी पितात त्यांनी घरी परत जावे.
कोणालाही २० मिनिटांपेक्षा जास्त काळ रडण्याची परवानगी नाही.